‘कन्येचा वाढदिवस माहेर संस्थेत साजरा
जाकादेवी | संतोष पवार : नवजीवन विद्यालय फुणगूस मधील सहाय्यक शिक्षक श्री. सुरेश श्रीरंग रणदिवे यांनी आपली कन्या कुमारी शिवन्या हिचा 9 मार्च हा सातवा वाढदिवस निवळी फाट्याजवळील समर्थनगर येथील ‘माहेर संस्थेत ‘ साजरा केला.’जे का रंजले गांजले l त्यासी म्हणे जो आपुले ll ‘या जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगाचा प्रत्यय त्या दिवशी सर्वांना आला.माहेर संस्थेतील बालके व वृद्ध यांचा जीवनानुभव घ्यावा ,त्यांचे दुःख समजावे ,त्यांना काही काळ तरी आनंदाचा क्षण उपलब्ध करून द्यावा, आपल्या मुलांनाही त्यांचं दुःख अनुभवता यावे, या माध्यमातून सामाजिक ऋण फेडता यावे ,या उदात्त हेतूने जाकादेवी येथे वास्तव्यास असलेले शिक्षक श्री .सुरेश रणदिवे, सौ. शितल रणदिवे, चि. भूषण रणदिवे यांनी कुमारी -शिवन्या हिचा सातवा वाढदिवस निवळी फाट्याजवळील समर्थनगर येथील ‘माहेर संस्थेतील’ मुलांसोबत साजरा केला.
त्यांच्या समवेत स्नेहभोजनाचाही आनंद घेतला. तसेच या स्नेहभोजनासाठी रूपये 7000/ – ची देणगी दिली. माहेर संस्थेचे अधिक्षक, प्रकल्प प्रमुख, मा. श्री. सुनिल कांबळे, समाजसेविका शितल हिवराळे, श्री. हनुमंत कदम , श्री. उत्तम देशमुख , सौ. उज्वला देशमुख व श्री .मंदार भागवत यांनी कुमारी शिवन्याला शुभेच्छा दिल्या .या सेवाभावी उपक्रमाबद्दल त्यांचे अभिनंदन केले . रणदिवे परिवाराने माहेर संस्थेचे आभार मानले.
श्री .सुरेश रणदिवे व त्यांच्या कुटुंबीयांचा हा उपक्रम निश्चितच स्तुत्य, अभिनंदनीय व अनुकरणीय असाच आहे.