जागतिक महिला दिनानिमित्त गुहागर शिर गावातील कृषी विद्यापीठ तर्फे शेतकरी महिलांचा सन्मान

Google search engine
Google search engine

दापोली | प्रतिनिधी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण विभाग, कृषी महाविद्यालय आणि उद्यान विद्द्या महाविद्यालय, दापोली यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठातर्फे एकात्मिक फलोद्यान अभियांनांतर्गत मसालापिके उत्पादन आणि प्रक्रिया तंत्रज्ञान विषयक प्रशिक्षण वर्गाचे आयोजन गुहागर तालुक्यातील शिर गावात करण्यात आले होते.

याप्रसंगी कृषि आणि कृषि पूरक व्यवसायात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना मा. कुलगुरू डॉ. संजय सावंत यांच्या हस्ते “महिला सन्मान पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये शिर गावातील सौ. स्नेहा मोरे, श्रीमती सुहासिनी गुरव, सौ. सुप्रिया आंबेकर, सौ. पूर्वा भाटकर आणि शिर बुद्रुकच्या ठोंबरे वाडीतील महिलांचा उन्नती ग्रामसंघ यांचा समावेश होता. या पुरस्काराचे स्वरूप असे होते – सन्मान पत्र, सन्मान मेडल, शाल, श्रीफळ, विद्यापीठ विकसित 11 प्रकारच्या भाजीपाला जातींचे बियाणे, जायफळ कँडी, करवंद कँडी, चॉकलेटेस, कापडी रुमालांचा गुच्छ आणि गुलाब फुल.

याप्रसंगी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रमोद सावंत, उद्यानविद्या महाविद्यालय, दापोलीचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. पराग हळदणकर, सहाय्यक प्राध्यापक डॉ. योगेश परुळेकर, डॉ. महेश कुलकर्णी, सहयोगी प्राध्यापक डॉ. मनीष कस्तुरे, वरिष्ठ संशोधन सहाय्यक, डॉ. प्रवीण झगडे, तालुका कृषि अधिकारी श्री अमोल क्षीरसागर, सरपंच श्री. विजय धोपट, ग्रामपंचायत सदस्या सौ. अमिषा ठोंबरे, सौ. ऋतुजा आंबेकर, सौ. पूर्वजा गुरव, सौ संजना मोरे, गावप्रमुख श्री शांताराम ठोंबरे, पाणलोट सचिव श्री मंगेश मते, ग्रामविकास अधिकारी श्री मछिंद्र देवकाते, सीआरपी सौ. रसवंती गोरीवले, सौ. अनघा गुरव, सौ सविता पाटील हे उपस्थित होते.
या प्रशिक्षण शिबिरात डॉ. हळदणकर यांनी जायफळ लागवड, डॉ योगेश परुळेकर यांनी काळीमिरी आणि दालचिनी लागवड यांनी हळद लागवड आणि डॉ महेश कुलकर्णी यांनी मसाला पिके प्रक्रिया या विषयांवर मार्गदर्शन केले. डॉ. प्रवीण झगडे यांनी विद्यापीठ तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार आणि श्री अमोल क्षीरसागर यांनी कृषि विभागाच्या योजना विषयी माहिती दिली.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सर्व तज्ञांनी समर्पक उत्तरे देऊन त्यांचे शंका समाधान केले. शेवटी सर्व प्रशिक्षणार्थीना प्रत्येकी दोन काळीमिरी रोपे व प्रशस्तिपत्रे देण्यात आली. या शिबिराचा एकूण 166 शेतकरी महिलांनी फायदा घेतला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ पराग हळदणकर यांनी केले तर डॉ योगेश परुळेकर यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ प्रवीण झगडे यांनी केले.

या प्रशिक्षण वर्गाच्या यशस्वी आयोजनासाठी उद्यानविद्या महाविद्यालयातील रोशन वराडकर, भावना शिगवण, ओंकार संकुळकर, सचिन गुरव, सचिन गोरिवले तसेच विस्तार शिक्षण विभागातील डॉ प्रवीण झगडे, नरेश आईनकर, श्रीयश पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. सर्व उपस्थितांनी सन्मान प्राप्त महिलांचे कौतुक आणि अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच कृषि विद्यापीठाने शेती क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांची दखल घेऊन त्यांना जागतिक महिला दिनी सन्मानित केले यासाठी विद्यापीठाला धन्यवाद दिले