गुहागर | प्रतिनिधी : गुहागर तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर मध्ये विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट झाले आहे. दिनांक २८ फेब्रुवारी २०२३ रोजी महाविद्यालयातील प्लेसमेंट विभागाच्या वतीने एकदिवसीय कँम्पस मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भारतभर विस्तार असलेली कोर इंडिया प्रोजेक्ट कंपनीने महाविद्यालयातील विद्यार्थांचे कँम्पस मुलाखत घेतले. यामध्ये महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्षाच्या एकूण १३ विद्यार्थांची निवड झाली. यामध्ये साहिल जाधव, कौशल्य साठे, गणेश मूरकर, युवराज जाधव, अजय गुरव, प्रफुल्ल रसाळ, ब्रह्मानंद काळे, धीरज साळवी, सोहम खातू, आदिती बागकर, श्रुतिका पवार, सागर जड्यार, रुतिका पवार इत्यादी विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. विजय बेडेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र सोनी, उपप्राचार्य अविनाश पवार, विभागप्रमुख प्रा. नंदकिशोर चौगुले, प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. भारत पवार व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कडून यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे महाविद्यालयातर्फे अभिनंदन करण्यात येत आहे.