सांगुळवाडी येथे 15 मार्च रोजी जिल्हास्तरीय काजू परिसंवाद चे आयोजन

वैभववाडी | प्रतिनिधी : सांगुळवाडी येथील कृषी महाविद्यालयात जिल्हास्तरीय काजू पीक परीसंवाद आणि काजू विविधता मेळा याचे आयोजन बुधवार दि. 15 मार्च रोजी सकाळी 10 वाजता करण्यात आला आहे. कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले यांच्यामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या परिसंवादाला दापोली कृषी विद्यापीठाचे वरिष्ठ कीटक शास्त्रज्ञ डॉ. व्ही. एस. देसाई, काजू शास्त्रज्ञ डॉ. भिंगार्डे, डॉ. खापरे आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी काजू स्थानिक वाण प्रदर्शनाचे ही आयोजन करण्यात आले आहे. तरी या परिसंवाद व मेळ्याला जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले यांच्या वतीने करण्यात आले आहे.