गुहागर | प्रतिनिधी : तालुक्यातील तळवली चिंचवाडी येथे बुधवार दिनांक 15 रोजी श्री संत तुकाराम महाराज मंदिर जीर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
दोन दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात 15 रोजी श्री संत तुकाराम महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठापना ह. भ.प. गोविंद साळवी यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे.तर 16 रोजी हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून बुधवार दि 15 रोजी सकाळी 8 वा.तुकाराम महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठापना,सकाळी 9 वा.सचिन साळवी यांचे कीर्तन,संध्याकाळी 7 वाजता तळवली वारकरी संप्रदाय यांचा हरिपाठ,रात्री 10 वाजता श्रीधर आग्रे यांचे भजन,रात्री 11 वाजता श्री सुकाईदेवी तळवली यांचा बहुरंगी तमाशा,गुरुवार दि.16 रोजी सकाळी 8 वाजता श्री तुकाराम महाराज मूर्ती अभिषेक,सकाळी 11 वाजता महाआरती,संध्या 4 वा. महिलांचे हळदीकुंकू,संध्या 7 वाजता गुरू आजरेकर माऊली पंढरपूर यांचे कीर्तन,रात्री 9 वा. महाप्रसाद,रात्री 10 वाजता.सुरेश सांगळे यांचे भजन,रात्री 11 वाजता सुरेश शिगवण व संजय ताम्हणकर यांचे भजन पार पडणार आहे.तरी या कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री संत तुकाराम महाराज सेवा मंडळ व महिला मंडळ यांच्यावतीने करण्यात आले आहे.