चिपळूण येथे १५ रोजी काथ्यावर आधारित उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम

चिपळूण | वार्ताहर : महाराष्ट्र काथ्या धोरण 2018 अंतर्गत महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळ मुंबई पुरस्कृत तथा महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र रत्नागिरी आयोजित मोफत एकदिवसीय उद्योजकता परिचय कार्यक्रम चिपळूण येथे पंचायत समिती सभागृह येथे दिनांक 15 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे.काथ्या उद्योगाचे संवर्धन, प्रचार व प्रसार करण्याकरता या मोफत एकदिवसीय उद्योजकता परिचय कार्यक्रमाचे आयोजन रत्नागिरी कार्यालयातर्फे करण्यात आले असून कोकण विभाग काथ्या उद्योग व्यवसाय मधील विविध उद्योग संधी महाराष्ट्र कोकण विभागात धोरण 2018 बदलाची माहिती यासोबत विविध काथ्या उत्पादनाची माहिती आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे काट्यावर आधारित कुटीर उद्योग याबाबत मार्गदर्शन व माहिती देण्यात येणार आहे. त्याचबरोबर शासकीय कर्ज योजना सबसिडी योजनांची माहिती देखील कार्यक्रमात दिली जाणार आहे.

मोफत एक दिवशी कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्या बेरोजगार युवक, युवती, महिला, माजी सैनिक, अपंग, बचत गट सदस्य सर्वांना नारळाच्या सोडण्यापासून काथ्या तयार करून त्यापासून दोरी तयार करणे , मॅक्स तयार करणे, पायपुसणे तयार करणे, विविध फॅशनेबल वस्तूंची निर्मिती करणे याबाबतच्या लघु उद्योगासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येईल. मोफत एकदिवशी कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्या पात्र युवक युवती करतात पुढे ३० दिवसांचा मोफत उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजन आयटी मेंटार्स शिवनदि जवळ चिंचनाका येथे एक महिना असणार आहे. यासाठी वयोमर्यादा 18 ते 50 वर्षे पूर्ण आणि सातवी पास असणाऱ्या युवक युवतींना कार्यक्रमास सहभागी होता येईल . मोफत प्रशिक्षण सोबत पूर्ण वेळ उपस्थित असणाऱ्या लाभार्थ्यांना शासनाचे प्रमाणपत्र आणि 2000 विद्या वेतन दिली जाईल. इच्छुक युवक युवती महिलांनी बुधवार 15 रोजी आय टी mentors चिपळूण येथे सकाळी अकरा वाजता उपस्थित राहावे असे महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळ मुंबई महाराष्ट्र उद्योग विकास केंद्र रत्नागिरी यांनी प्रसिद्ध केलेल्या माहिती पत्रकात म्हटले आहे संपर्कासाठी सुनील डिंगणकर नंबर 737894 69 55 यावर संपर्क साधावा.