सावंतवाडी वकील संघटनेतर्फे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष ॲड. परिमल नाईक यांचा सत्कार

Google search engine
Google search engine

जिल्हा संघटनेच्या सहकारी पदाधिकार्‍यांनाही केले सन्मानित

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी वकील संघटनेच्या वतीने नवनिर्वाचित सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. परिमल नाईक व सहकारी पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी ज्येष्ठ वकील ॲड. सुभाष पणदूरकर व ॲड. दिलीप नार्वेकर यांच्याहस्ते अध्यक्ष ॲड. परिमल नाईक यांचा तर खजिनदार ॲड. अण्णा बांदेकर यांचा ॲड. शाम गोडकर यांच्याहस्ते तर उपाध्यक्ष (महिला) ॲड. निलिमा गावडे यांचा ॲड. सुभाष पणदूरकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी ॲड. श्रीकृष्ण ओगले, ॲड. गणेश पारकर, ॲड. भुवन कुबल तसेच सावंतवाडी वकील संघटनेचे ज्येष्ठ सदस्य ॲड. संदीप निंबाळकर, ॲड. शाम सावंत, ॲड. अमोल कविटकर, ॲड. रामनाथ बावकर, ॲड. श्रीनिवास गवस, ॲड. पी. डी. देसाई, ॲड. अजित राणे, ॲड. नीता कविटकर, ॲड. शेटकर, ॲड. रणशूर, ॲड. प्रकाश परब, ॲड. राघवेंद्र नार्वेकर यांच्यासह महिला व पुरुष वकील वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी ॲड. गोडकर, ॲड. शाम सावंत, ॲड. नीता सावंत, ॲड. संदीप निंबाळकर, ॲड. अमोल कविटकर, ॲड. दिलीप नार्वेकर, ॲड. सुभाष पणदूरकर यांनी सत्कारपर मनोगत व्यक्त केले.

वकीली व्यवसायचा दर्जा व मानसन्मान उंचावण्यासाठी तसेच नवोदित वकिलांच्या सक्षम भवितव्यासाठी आणि वकील व्यावसायिक विविध सुविधा वेळोवेळी प्राप्त करून देण्यासाठी सकरात्मकरित्या सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे मनोगत ॲड. परिमल नाईक यांनी व्यक्त केले.

Sindhudurg