गुहागर तहसिल कार्यालयावर धडकणार विराट मोर्चा….
गुहागर | प्रतिनिधी : सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत व अंशकालीन कंत्राटी रोजंदारी कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने एनपीएस योजना रद्द करुन सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी दिनांक १४ मार्च २०२३ होणाऱ्या ऐतिहासिक बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर काल शासकीय विश्रामगृह गुहागर येथे गुहागर तालुक्यातील सर्व सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर नगरपंचायत व अंशकालीन कंत्राटी रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संघटनांची एक संयुक्त सभा पार पडली यावेळी या सभेला गुहागर तालुक्यातील विविध विभागांतील सर्व सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर नगरपंचायत व अंशकालीन कंत्राटी रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांचे अध्यक्ष, सचिव व प्रतिनिधी उपस्थित होते जुनी पेन्शन संदर्भात कर्मचारी समन्वय समिती व शासन यांच्यातील यांच्यातील चर्चा फोल ठरली आहे त्याविरोधात राज्यभरातील कर्मचाऱ्यांच्या बरोबरच गुहागर तालुक्यातीलही सर्व कर्मचाऱ्यांनी एकीची वज्रमूठ आवळलेली दिसुन येत आहे मंगळवार १४ मार्च रोजी गुहागर येथे तालुक्यातील सर्व कर्मचाऱ्यांचा “विराट मोर्चाचे” आयोजन करण्यात आले आहे या ऐतिहासिक मोर्चाला सर्व शासकीय विभागांतील सर्व सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर नगरपंचायत व अंशकालीन कंत्राटी रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती लाभणार आहे सदर मोर्चा पंचायत समिती गुहागर ते तहसील कार्यालय गुहागर असा असणार असुन मोर्चा सकाळी ठीक १० : ३० वाजता पंचायत समिती गुहागर येथे सुरू होणार आहे सुरुवातीला तालुक्याचे गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले जाईल यानंतर ठराविक मनोगते व्यक्त केली जातील त्यानंतर पंचायत समिती पासून मोर्चाची सुरुवात होईल तालुक्याच्या तहसिलदार महोदया यांना निवेदन देऊन त्याच ठिकाणी मोर्च्याची सांगता होणार आहे मोर्चामध्ये, संपामध्ये, सहभागी असणारे सर्व शंभर टक्के कर्मचारी कसे हजर राहतील त्यासंबंधीचे नियोजन संबंधित घटक संघटनांनी केले आहे सदर संप यशस्वी करण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन गुहागर तालुका सर्व सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर नगरपंचायत व अंशकालीन कंत्राटी रोजंदारी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे