कणकवली : जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी याप्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी कणकवली येथील जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटना आणि परिचारिका संघटना यांनी पंचायत समिती परिसरात सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास जोरदार निदर्शने केली.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून संप पुकारला आहे. जिल्ह्यातील विविध कर्मचारी संघटना या संपात सहभागी झाल्या आहेत.
या आंदोलनात जिल्हापरिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटना अध्यक्ष मनोज कुमार चव्हाण, उपाध्यक्षा नीलम जाधव, सचिव आनंद जाधव यांच्यासह २८ कर्मचारी तर परिचारिका संघटना अध्यक्षा आश्लेषा कदम यांच्यासह ३० परिचारिका निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते.