संघटनांचा रोष पत्करून विद्यार्थ्यांच्या हितासाठी शाळा ठेवली सुरू
अनिकेत जामसंडेकर | खारेपाटन : वारगाव शाळा नं.१ च्या उपशिक्षिका सोनाली रमाकांत कुर्ले यांनी संघटनांचा रोष पत्करून विद्यार्थ्यांच्या हितासाठी शाळा सुरू ठेवली. आज जुना पेन्शन योजनेसाठी जिल्हा सह राज्यातील सर्व संघटना संपावर गेलेल्या असतानाही वारगाव प्राथमिक शाळेतील उपशिक्षिका सोनाली कुरले यांनी शाळा सुरू ठेवून शिक्षक हा विद्यार्थी प्रिय असतो आणि शिक्षकी पेशाला शोभेल अशी वर्तन शिक्षकाने करावे हेच यातून दाखवून दिले.
समाजात शिक्षकाला गुरुचे स्थान आहे. त्याला कारण स्वतःच्या मागणीसाठी शिक्षक विद्यार्थ्यांना कधीही वेटेज धरत नाहीत हेच या शिक्षिकेने समाजाला दाखवून दिले आहे. विद्यार्थ्यांचे अध्ययन आणि अध्यापनाचे काम थांबू नये अशी मानसिकता शिक्षकांमध्ये असणे गरजेचे आहे. जुनी पेन्शन योजनेसाठी शिक्षकाने विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये, सिंधुदुर्गात आज अनेक शाळा शिक्षकांच्या संपामुळे बंद राहिल्या मात्र वारगाव शाळा यासाठी अपवाद ठरली.दरम्यान
वारगाव सरपंच सौ. नम्रता नारायण शेटे, उपसरपंच नाना शेट्ये, अजित लिंगायत, प्रदीप जाधव, विकास जाधव, विलास तळेकर, सुभाष धावडे, मानसी मेस्त्री, कांचन जाधव, प्रमोद पांगरे यांनी वारगाव नं.१ शाळेला भेट देवून उपशिक्षिका सोनाली रमाकांत कुर्ले यांचे अभिनंदन केले आहे.