रत्नागिरी | प्रतिनिधी : शाहू फुले आंबेडकर चळवळीतील सक्रिय कार्यकर्त्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या लांजा तालुका महिला अध्यक्षा मीनल कुष्टे (राह.अमृतसृष्टी कॉलनी, केळंबे ) यांचे सोमवारी (दि.१३ मार्च रोजी ) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.त्यांच्या पश्चात निलेश आणि मुक्ता अशी दोन मुले आहेत. त्यांच्या अचानक जाण्याने सोषल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रध्दांजली वाहण्यात येत आहे.
अंत्यविधीचे कोणत्याही प्रकारचे धार्मिक विधी करावयाचे नाहीत हे त्यांनी अगोदरच सांगितले होते. त्याद्वारे पुरोगामी विचाराचा पायंडा पाडून दिला. विचारांची पकड, तळागळातल्या माणसांसाठी संघर्ष करण्याची ताकत, गल्ली पासून दिल्ली पर्यंतच्या राजकीय पटलांवर नवी वाट कोरण्याची अदम्य इच्छाशक्ती आणि शाहू फुले आंबेडकरांच्या चळवळीचा रथ पुढे ओढण्याची प्रचंड ताकत डॉक्टर मिनल कुष्टे यांच्याकडे होती. आपल्या विचारातून, लेखणीतून समाजासाठी काहीतरी नवीन करण्याची त्यांची धडपड सुरू होती. आपल्या सामाजिक कार्याची जान ठेवून अनेक महिलांना योग्य मार्गदर्शन करत होत्या. या सर्व कार्याची दखल घेऊन ॲड. बाळासाहेब आंबेडकर आणि वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी २०१९ पासून वंचित बहुजन आघाडीची लांजा महिला तालुकाध्यक्ष जबाबदारी त्याच्यावर सोफवली. पक्ष संघटनेच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यात तालुक्यात अनेक कार्यक्रम हाती घेतले होते. प्रत्येक आंदोलनात सक्रिय सहभाग घेत असत. निसर्गावर नितांत प्रेम करणे, कोणत्याही जाती धर्मातील लोकांच्या अन्यायाविरुद्ध उभ राहण्याची डॉक्टर मीनलताई कुष्टे यांची ख्याती होती.
ताईं, तुमच्या जाण्याने चळवळीची हानी झाली आहे. तुमच्या सारखे नेतृत्व मिळताना कठीण आहे. तुमच्या कार्याला लाख लाख सलाम! अशा शब्दात मिनलताई कुष्टे यांना वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा महासचिव प्रशांत कदम यांनी भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे.
डॉक्टर मीनलताई कुष्टे अन्यायाच्या विरुद्ध लढा उभारण्यात त्या कायम आघाडीवर असायच्या. एका खंबीर व व्यक्तिमत्वाची आपल्यातून अचानक exit झाली ही गोष्ट सर्वांसाठी धक्कादायक आहे. मरावे परी किर्तीरूपे उरावे त्याप्रमाणे त्यांनी लिहिलेले लेख कायम त्यांच्या बंडखोर वृत्तीची आणि पुरोगामी विचारांची आठवण करून देतील. या शब्दात नितीन कदम यांनी मीनलताई यांना श्रद्धांजली वाहली आहे.