रत्नागिरी : हिंदू तेज, दक्षिण रत्नागिरीतर्फे सोशल मीडिया कार्यशाळेचे आयोजन येत्या शनिवारी (ता. १८) सायंकाळी ६.३० ते रात्री ९ वाजेपर्यंत झाडगाव येथील माधवराव मुळ्ये भवन येथे करण्यात आले आहे. ही कार्यशाळा तरुण, तरुणी, नागरिकांसाठी विनामूल्य आहे.
या कार्यशाळेमध्ये ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुक वापरण्याकरिता मार्गदर्शक सूचना व बहुमूल्य माहिती देण्यात येणार आहे. तसेच फोटो व व्हिडिओ एडिटिंगचे प्राथमिक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याशिवाय हे सर्व सोशल मीडिया वापरताना कोणती पथ्ये पाळावीत, न वाचता कोणताही मजकूर पुढे पाठवू नये, याबाबतच्या सूचना, माहिती दिली जाणार आहे. या कार्यशाळेत कोकण प्रांत प्रचार विभागाचे सोशल मिडीयाप्रमुख ओंकार बर्डे आणि सहप्रमुख राहुल महांगरे मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यशाळेच्या अधिक माहिती व नोंदणीसाठी 8830548713 या क्रमांकवर संपर्क साधावा. तसेच नोंदणी खालील लिंकवर करावी, असे आवाहन केले आहे.
https://forms.gle/chEfPMsu5rQJ5cxq7