न्हावेली – आरोस रस्ता ते रेवटेवाडी जोडणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन

न्हावेली – प्रतिनिधी
न्हावेली- आरोस रस्ता ते रेवटेवाडीला जोडणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन भाजप जिल्हा अध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
यावेळी सरपंच अंकित धाऊसकर, उपसरपंच संतोष नाईक , सदस्य अक्षय पार्सेकर , सौ आरती माळकर, प्रमोद गावडे , प्रसाद गावडे, राज धवन , समीर पार्सेकर, सुदन पार्सेकर, योगेश पार्सेकर, नितीन पालयेकर, राजन कालवंकर, बाळू सावळ, संजय दळवी, भिवा नाईक, सुनील धाऊसकर व ग्रामस्थ उपस्थित होते.
मागील कित्येक वर्षांपासून या रस्त्यासाठी येथील ग्रामस्थांची मागणी होती अखेर पालकमंत्री निधीतुन या रस्त्याला निधी मंजूर झाला यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी या रस्त्यासाठी निधी मंजूर होऊन काम सूर केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.