सरकारी कार्यालयात शुकशुकाट…
कर्मचाऱ्यांनी काढला गुहागर तहसिल कार्यालयावर विराट मोर्चा…
जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी कर्मचारी आक्रमक…
गुहागर | प्रतिनिधी : सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत व अंशकालीन कंत्राटी रोजंदारी कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने एनपीएस योजना रद्द करुन सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी आज दिनांक १४ मार्च २०२३ होणाऱ्या राज्यव्यापी ऐतिहासिक बेमुदत संपाचे पडसाद गुहागर तालुक्यातही तीव्रतेने पहायला मिळाले या राज्यव्यापी संपाला गुहागर तालुक्यात ही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी कर्मचारी आक्रमक झाल्याचे पहावयास मिळत आहे तहसिल कार्यालय, पंचायत समितीची अंतर्गत येणाऱी विविध कार्यालये कृषी अधिकारी कार्यालय, शाळा ,कॉलेज, भूमी अभिलेख कार्यालय रुग्णालये प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे येथील सर्व सरकारी निमसरकारी कार्यालयातील कर्मचारी संपावर गेल्याने शुकशुकाट पहायला मिळला त्यामुळे सामान्य नागरिकांची कामे खोळंबली.रुग्णसेवेवरही त्याचा परिणाम दिसून आला शाळा तसेच महाविद्यालयातील शिक्षक संपावर गेल्याने शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना घरी जावे लागले.
इयत्ता बारावी च्या विद्यार्थ्यांचा पेपर मात्र सुरळीत पणे सुरू होते गुहागर तालुक्यातील सर्व सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर नगरपंचायत व अंशकालीन कंत्राटी रोजंदारी कर्मचाऱ्यांनी राज्यभरातील कर्मचाऱ्यांच्या बरोबरच गुहागर तालुक्यातीलही सर्व कर्मचाऱ्यांनी एकीची वज्रमूठ आवळलेली दिसुन आली आज १४ मार्च रोजी गुहागर येथे तालुक्यातील सर्व कर्मचाऱ्यांचा “विराट मोर्चाचे” आयोजन करण्यात आले होते त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या ऐतिहासिक मोर्चाला सर्व शासकीय विभागांतील सर्व सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर नगरपंचायत व अंशकालीन कंत्राटी रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची उपस्थिती लाभली सदर मोर्चाला गुहागर पंचायत समिती गुहागर येथुन सुरूवात झाली कर्मचाऱ्यांच्या “एकच मिशन जुनी पेन्शन” या घोषणेने व पेन्शन गीतांनी गुहागर बाजारपेठेतील परिसर दुमदुमून गेला होता विविध विभागांतील संपकरी कर्मचाऱ्यांनी गायलेल्या पेन्शन गीतांनी संपकरी कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवला कित्येक कर्मचारी सहकुटुंब सहपरिवार या मोर्चात सहभागी झाल्याचे दिसून आले सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी तालुक्याचे गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांना निवेदन देण्यात आले यानंतर मनोगते व्यक्त केली त्यानंतर सर्व कर्मचा-यांचा मोर्चा तहसिल कार्यालयावर धडकला तालुक्याच्या तहसिलदार प्रतिभा वराळे यांना निवेदन देण्यात आले त्याच ठिकाणी विविध घटक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी भाषणे केली मोर्चामध्ये, संपामध्ये, सहभागा संबंधीचे नियोजन संबंधित घटक संघटनांनी यशस्वीरित्या केले आहे या संपात स्वतःला पेन्शन असणारे जेष्ठ कर्मचारी बंधुभगिनीं ही मोठ्या संख्येने संपात सहभागी झाल्याचे निदर्शनास येत आहे या संपात महिला कर्मचाऱ्यांचा लक्षणीय सहभाग दिसून येत आहे. सदर संप यशस्वी करण्यासाठी अश्याच मोठ्या संख्येने सहभागी राहण्याबद्दल तसेच आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याबाबतचे आवाहन गुहागर तालुका सर्व सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर नगरपंचायत व अंशकालीन कंत्राटी रोजंदारी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने कर्मचाऱ्यांना करण्यात आले आहे