प्राथमिक शिक्षक भारती महिला आघाडीचा जिल्हास्तरीय महिला मेळावा उत्साहात संपन्न!

Google search engine
Google search engine

मसुरे | झुंजार पेडणेकर : प्राथमिक शिक्षक भारती महिला आघाडी शाखा मालवण तर्फे ओरोस येथे शिक्षक भारती महिला आघाडी अध्यक्षा श्रीम शितल परुळेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय महिला मेळावा पार पडला. मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले आणि फातिमाजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिंधुदुर्ग महिला आघाडी सचिव श्रीम वैशाली मिसाळ यांनी केले. यावेळी आशा गुणिजन यांनी संघटनेला २५ हजार रु ची देणगी दिली.

यानंतर शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या मावळत्या अध्यक्षा आशा गुणिजन मॅडम व श्रीम विजया डगरे मॅडम यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार करण्यात आला. यावेळी प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गचे अध्यक्ष श्री संतोष पाताडे यांनी जुनी पेन्शन,महिलांचे प्रश्न,संघटनेची दिशा व धोरणे याबाबत मार्गदर्शन केले. राज्य उपाध्यक्ष श्री दया नाईक यांनी प्राथमिक शिक्षक पतपेढी सिंधुदुर्ग कडून शिक्षकांवर होणारा अन्याय याबाबत उपोषण करण्याचे सूतोवाच केले. तसेच श्रीमती परुळेकर यांनी आपल्या भाषणातून शिक्षक भारतीने यशस्वी केलेल्या ‘आंतरजिल्हा बदली समावेश” या संदर्भात संघटनेचे योगदान अधोरेखित केले.यावेळी जिल्हाध्यक्षा सौ गुणिजन मॅडम यांनी संघटनेच्या पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या. तसेच श्रीम प्रीती सावंत,श्रीम रुपाली जाधव व श्रीम शरयू पाटील यांनी आपल्या मनोगतातून महिलांना मार्गदर्शन केले. सर्व महिला शिक्षकांनी सांस्कृतिक कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. स्मिता गावडे, लीना भंडलकर ,स्नेहल बेलसरे यांनी बहारदार वैयक्तिक नृत्य सादर केले. दोडामार्ग येथील शिक्षीकांनी सामूहिक नृत्य केले. आंबेरी, कणकवली, कुडाळ येथील शिक्षकांनी देखील आपली बहारदार नृत्ये सादर केली. सरिता नाईक व केळुसकर यांनी काढलेली रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. उपस्थित प्रेक्षकांमधून 8 जणांना लकी ड्रॉ देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दीपक ठाकरे व महेश कदम यांनी केले. आभार महिला आघाडी अध्यक्षा श्रीम शितल परुळेकर यांनी मानले.

या कार्यक्रमाला कोषाध्यक्ष विनेश जाधव,महेश कदम,विठ्ठल शिंदे, पांडूरंग थेटे, मधुकर बाचिफळे,तुकाराम खिल्लारे,दिनकर शिरवलकर, कृष्णा कालकुंद्रिकर इ चे सहकार्य लाभले.सदर कार्यक्रमाला प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग चे अध्यक्ष श्री संतोष पाताडे, राज्य उपाध्यक्ष श्री दया नाईक, जिल्हा महिला आघाडी सचिव वैशाली गर्कळ ,कुडाळ महिला आघाडी अध्यक्षा प्रीती सावंत ,दोडामार्ग अध्यक्षा शरयू पाटील, कणकवली प्रतिनिधी रुपाली जाधव, मालवण शिक्षक भारती चे अध्यक्ष संतोष कोचरेकर ,सचिव श्री संतोष परब, जिल्हा प्रतिनिधी श्रीम लीना भंडलकर, नेहा गवाणकर,जयश्री दोडके इ. उपस्थित होते.