भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाचे प्रथम प्राचार्य डॉ. सुरेंद्र पारकर यांचे निधन

Google search engine
Google search engine

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडीतील राणी जानकीबाई वैद्यकीय संस्था संचलित कै. भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाचे प्रथम प्राचार्य व मुंबई विद्यापीठाच्या आयुर्वेद विद्याशाखेचे माजी अधिष्ठाता डॉ. सुरेंद्र पारकर यांचे बुधवारी त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी निधन झाले.डॉ. सुरेंद्र पारकर हे ६ ऑगस्ट १९८४ ते ३१ जानेवारी २००१ पर्यंत सावंतवाडीतील आयुर्वेद महाविद्यालयात प्राचार्य तथा प्राध्यापक (द्रव्यगुण विज्ञान) पदावर कार्यरत होते. तसेच त्यांनी लायन्स क्लब सावंतवाडीचे सदस्य, सेक्रेटरी, खजिनदार व अध्यक्ष म्हणूनही कार्य केले होते. या पदांच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले. त्या काळात अनेक मेडिकल कॅम्प आयोजित केले होते. आयुर्वेद काॅलेज आणि हाॅस्पिटलसाठी योगदानाने अनेक रूग्णांना फायदा झाला होता. ते विद्यार्थी प्रिय अध्यापक होते. त्यांच्या शिस्तीमुळे व मेहनतीमुळे महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागतं होता. उत्कृष्ट प्रशासकीय कौशल्य, दर्जेदार वक्ते, विद्यार्थी प्रिय व्यक्ती म्हणून त्यांची ख्याती होती.
डॉ. सुरेंद्र पारकर यांच्या निधनाने त्यांच्याच भाषेत सांगायचे तर “आमचं घरकुल पोरकं झालं आहे” आणि घरकुलातील शिरिष कायमचाच हरपला आहे अशा शब्दांत भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय परिवारातर्फे त्यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.