आश्रय ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने जागतिक महिला दिनी करणेत आला कर्तुत्ववान महिलांचा सन्मान

Google search engine
Google search engine

 

रत्नागिरी : प्रतिनिधी : महिला दिनाचे औचित्य साधून आश्रय ज्येष्ठ नागरिक संघटना, रत्नागिरी यांचे वतीने शहरातील कर्तुत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.
महिलांच्या अनन्यसाधारण योगदानामुळे समाजाला सुसंस्कृत विचार व आकार प्राप्त झाला आहे. आजच्या दिनानिमित्त महिलांची स्थिती त्याची प्रगती आणि त्यांच्याविषयी समाजात असलेला दुजाभाव याविषयी चिंतन करणे आवश्यक आहे. स्त्रीला समाजात सन्मानाचे स्थान तसेच तिचा हक्क व अधिकार मिळणे आवश्यक आहे. तरच समाजाला एक चांगली दिशा चांगला विचार मिळेल.
जागतिक महिला दिनी आपले घर,कुटुंब सांभाळून गोरगरिब जनतेची सेवा कोणत्याही प्रकारची आशा न बाळगता आणि प्रसिध्दीच्या झोतात न आलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला.
आश्रय
संघटनेचे संस्थापक सुहेल मुकादम यांनी या कार्यक्रमाचे महत्व विशद करून ज्या महिला प्रामाणिकपणाने सेवा करीत आहेत त्यांचा सन्मान हा महिला दिनाच्या निमीत्ताने करणे हे आपले कर्तव्य असल्याचे प्रतिपादन केले.
यावेळी ज्येष्ठ लेखिका व समाजसेविका श्रीमती. श्रध्दा कळंबटे यांनी ही याबाबत समाधान व्यक्त करीत सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सिव्हील हॉस्पिटल रत्नागिरी चे रक्तपेढी मधील महिला ,व्यसनमुक्ती कक्षातील सेवक, corona काळात अहो रात्र मेहनत घेतलेल्या आशाताई,डाॅक्टर आणि विविध क्षेत्रातील महिला यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी राजिवडा परिसरातील महिलांचे आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले.
यावेळी संघटनेचे सचिव अहमद मालवणकर, असलम गवाणकर, आदील फणसोपकर,
नुरूद्दिन सुवर्णदुर्गकर,रियाज दलाल,उमर मुल्ला,
निलेश जाधव,प्रतिक खैरे,दीपक कोळगे, जिब्रान तांडेल,इब्राहीम खान तसेच संपर्क युनिक फाउंडेशन रत्नागिरी चे अध्यक्ष शकील गवाणकर, महिला संघटक जया डावर आदी मान्यवर तसेच मोठ्या संख्येने महिला
उपस्थित होत्या.