दशावतारातला तळपता रवि…रवि सावंत

प्रा.वैभव खानोलकर : सिधुदुर्ग

तुमची मिळकत जर तुमच्या कुटुंबाच्या गरजा भागविण्यासाठी पुरेशी असेल.तर तुम्ही स्वतःला श्रीमंत आहात असे समजा.

कारण श्रीमंतीची नेमकी व्याख्या आजपर्यंत कोणालाच करता आलेली नाही.

जेवढ्या संपत्तीचा तुम्ही उपभोग घेता…….तेवढीच संपत्ती तुमची असते.

जास्त संपत्ती म्हणजे गाढवाच्या पाठीवरील सोन्याच्या गाठोड्या सारखी असते.

ओझं सांभाळण्याच्या पलीकडे त्याला त्याचा काहीच उपयोग नसतो.

खरंतर..आयुष्याची गणित बोटावर सोडविण्याइतकी सोपी असतात.

पण भीतीचे आकडे, समाजाची काळजी व क्षणिक सुखाची ओढ अख्खा हिशोब चुकवतात.लक्षात ठेवा कितीही कमावलं तरी शेवटी बाकी राहते ती शून्य

आणि संकट समयी आपल्या कामाला येते ते निव्वळ आपले केलेले पुण्य म्हणून जे आहे त्यातही आनंदी राहणे हाच जीवनाचा आत्मा आहे. अस सहज साध तत्वज्ञान मांडताना आपल्या साध्या आणि सहज बोलण्यातुन अनेक सुंसस्कृत लोकांना हि अचबित करणारा कलावंत म्हणजे रवि सावंत.

बालपणी शाळेत रमायच्या ऐवजी शाळेला सतत दांडी मारण्याची सवय आणि यामुळेच अक्षर ओळख नाहीच त्यामुळे निरक्षराच्या यादीतले बिन कामाचे एक नाव ,.

बालपणा पासुनच अभिनयाची आवड असणारे रवि सावंत यांनी पहिला रंग लावला तो घावनळ्याच्या शिगमोत्सवात राधा म्हणुन पण लोकांच्या घरी राधा म्हणुन नाचणारे रवि दशावताराच्या क्षितीजावर तळपतील याची कल्पना खुद्द रवी सावंताना ही नव्हती कारण दशावतार हे काही “येरा गबाळ्याचे काम नव्हे तेथ पाहिजे कलावंत जातीचे” अक्षर ओळख नसणारा माणुस दशावतारात टिकेल आणि अनेक शिकलेल्या माणसाचा सामना कसा करेल अशीच काहिशी स्थिती पण जो मनाने खबीर असतो तो जगालाही पुरुन उरतो त्यामुळे अक्षर ओळख नसणे हा काही शाप नाही नाही ती कमतरता अस म्हणत ज्यानी आपल्याले कलात्मक अंग ओळखले आणि बिलीमारो म्हणुन त्याचे आगमन झाले.पण याच दरम्यान सहाय्यक कलावंत म्हणजे गडी हे कमी असल्याने त्याना गडीची कामे हि करावी लागली.

मैलनो-मैल चार चार बँका डोक्यावर घेऊन चालणे, जेवण करणे, भांडी धुणे आणि मग बिलिमारो अशी कामे करताना त्यांनी आपल्यातला कलावंत मरु दिला नाही मालकाची प्रामाणिकपणे सेवा करताना कितीहि काम असले तरी रंगमचावर एखाद दुसरे काम करायची संधी त्यांनी कधीच सोडली नाही कधी सेवक कधी गरीब स्त्री अशा भुमिकेतुन त्यांनी आपल्या भुमिकेना न्याय दिला.

अनेक दिग्गज कलावंता सोबत त्याचा सतत चा असणारा सहवासही तितकाच महत्वाचा होताच पण आपल्या अपमानाचा बदला घेण्याची महत्वाकांक्षा हि रवि सावंत यांची होती

अस म्हणतात कि,भूतकाळातील अपमानाच्या अश्रुं नीं भविष्याची वाट भिजलेली असेल तर तीव्र तापमानातही अनवाणी चालताना चटके लागत नाहीत.

तेच चटके त्यांनी सहज पचवले झेलले आणि कामगार कल्याण सारख्या प्रतिष्ठित नाट्य स्पर्धेत एका निरक्षर कलावंताने प्रथम क्रमांकाने बाजी मारली.

अनेक स्पर्धा त्यांनी आपल्या सादरीकरणाने गाजवल्या पण तरीहि त्यांनी आपल्यातले माणुस पण सोडले नाही एक स्त्री कलावंत असतानाही गडी कामगाराची कामे हि त्यांनी केली प्रसंगी जेवण केले भांडी धुतली आणि गाडीत इतर कलावंताच्या बँगा हि भरल्या.

मुळात कोणतच काम मोठे किंवा लहान नसते तर ती श्री ची सेवा असते.हि त्यांची भावना त्याना खुप काहि देऊन गेली.

प्रामाणिक राहाणे आणि कमी तिथे मी अशी वृत्ती जोपासत त्यानी आपल्या मुलांला शिकवले त्याला मृंदुगवादनाचे धडे दिले.आणि रवि सावंत याचे सुपुत्र सुधीर सावंत मृंदुगमणी म्हणुन रंगभुमीवर सेवा करु लागले सकाळी होमगार्ड म्हणुन शासकिय सेवा बजावताना रात्री रंगदेवतेला स्मरताना मोठ्या धीराने ते संगित साथ करु लागले..

आपल्या महाराष्ट्राची विचारधारा, लोकसंस्कृती घडवण्यात जसा अनेक उच्चविभुषित व्यक्तीचा हात आहे तसा अनेक अशिक्षित लोकांचा ही हात आहे. मराठीच्या साहित्यांची मराठ मोळे लेणं असणाऱ्या बहिणाबाई चौधरी ,सकाळी हातात झाडू घेऊन गाव स्वच्छ करणारे व रात्री कीर्तनातुन प्रबोधन करणारे गाडगेबाबा..अनाथाची माय स्वर्गिय सिंधुताई सपकाळ ,संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम ,संतचोखा मेळा यांनी कोणत्याही विद्यापीठात प्रवेश घेतला नाही ,

नाही त्याना कोणत्याही विद्यापीठाची पदवी मिळाली पण त्यानी दिलेले विचार ओवी,अंभग याचा आज विद्यापीठात केला जाणारा त्यावर अभ्यास करुन डाँक्टरेट मिळवण्याची विद्यार्थ्यांची धडपड ..

सगळच कसे कल्पनेतले वाटत पण हे वास्तव आहे.हे विसरता येणार नाही,

खरंच इतिहास रचणारे लोक कारण सागत बसत नाहीत ते प्रयत्नवादी असतात अन् मग त्याना त्यात ईश्वर गवसतो अन् रवि नावाचा अक्षर ओळख नसणारा हि माणुन कलेच्या दुनितेत सुर्या सारखा चमकतो..

अशा एका नटवर्याशी केलेली चर्चा अर्थात अंतरग दशावताराचे या मुलाखत सत्रात भेटुया घावनळे गावच्या सुपुत्राला रविवारी नेहमीच्यात वेळेत रात्री आठ वाजता २३ आँक्टोबर रोजी आपल्या प्रहार डिजिटल वर..

Sindhudurg