भाजपा बाळासाहेबांची शिवसेना सरकारकडून ग्राहकांची दिवाळी गोड
सावंतवाडी । प्रतिनिधी : सर्वसामान्य जनतेची यावर्षीची दिवाळी नव्या युती सरकारने गोड केली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अंत्योदय आणि केशरी शिधापत्रिकाधारकांना रेशन दुकानांतून शंभर रुपयांत रवा, साखर, तेल, चणाडाळीचे किट देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून हा ‘आनंदाचा शिदा ‘ राज्यातील रेशन दुकानांच्या माध्यमातून वितरीत केला जात आहे.
सावंतवाडी शहरात रेशन दुकानावर भाजप जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. त्यांच्या हस्ते हा ‘आनंदाचा शिदा’ वितरीत करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक आनंद नेवगी, विनोद सावंत, सत्या बांदेकर आदी उपस्थित होते.
Sindhudurg