ॲड.जमीर खलिफे यांच्या शिफारशीने शहरातील 56 लाख 47 हजार 700 रूपयांच्या कामांना मंजूरी

राजापूर नगरपरिषदेचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष ॲड.जमीर खलिफे यांच्या शिफारशीने शहरातील विविध पभागातील सुमारे 56 लाख 47 हजार 700 रूपयांच्या कामांना मंजूरी मिळाली असून लवकरच या कामांना सुरूवात होणार आहे. यामध्ये प्रभाग क्र.8 मधील साखळकरवाडी तिठा ते न.प.रस्ता डांबरीकरण करणे (22,75,800/-), प्रभाग क्र.3 मधील शंकर कुवेसकर घराला रस्ता रुंदीकरण करुन संरक्षक भिंत बांधणे (6,99,400/-), प्रभाग क्र.2 मधील कमलाकर जाधव घर ते सलाम खतीब घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे (5,67,200/-), प्रभाग क्र.7 मधील आंबेवाडी नवाळे घर ते नाखरेकर घर गटार करणे (7,79,900/-), प्रभाग क्र.6 मधील खडबशा रस्ता डांबरीकरण करणे (9,72,200/-), प्रभाग क्र. 5 मधील वस्ता दुकान ते गडकर दुकान पर्यंत लादीकरण (4,53,300/-) या कामांचा समावेश आहे.

माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष ॲड.जमीर खलिफे यांच्या शिफारशीने वैशिष्टयपूर्ण योजने अंतर्गत या कामांना निधी पाप्त झाला असून या कामांना तांत्रिक मंजूरी, निविदा प्रकीया पूर्ण झाली आहे. त्यामुळे लवकरच या कामांना सुरूवात होणार आहे.