सहवेदना : भारती सावंत यांचे निधन

 

रत्नागिरी : बौद्धजन पंचायत समिती शाखा क. 4 आंबेशेत या शाखेच्या सदस्या भारती अशोक सावंत यांचे रविवार 12 मार्च रोजी रात्री निधन झाले. त्यांचे वय 63 होते. त्या अत्यंत पेमळ, मनमिळावू स्वभावाच्या होत्या. त्यांचा सामाजिक कार्यात कायम सहभाग असायचा. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, पुतणे, पुतण्या, दीर, जावू, सूना, जावई, भाऊ, नातवंडे असा मोठा परिवार आहे.