बीच व्हॉलीबॉल स्पर्धेत ओजास फायटर रत्नागिरी विजेता ; चिवला बीच उपविजेता

Google search engine
Google search engine

माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य ; भाजप युवमोर्चा मालवण शहर उपाध्यक्ष सौरभ ताम्हणकर यांचे आयोजन

मालवण | प्रतिनिधी : भाजप प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता युवा मोर्चा मालवण शहर उपाध्यक्ष सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांच्यावतीने चिवला बीच येथे डे- नाईट स्वरूपाची बीच व्हॉलीबॉल स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत ओजास फायटर रत्नागिरी संघाने विजेतेपद पटकावले. तर चिवला बीच संघ उपविजेता ठरला. स्पर्धेला क्रीडा रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

भाजपा युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांच्या संकल्पनेतून चिवला बिच मित्रमंडळ,
चिवला बीच वॉटर स्पोर्ट्स व्यावसायिक आणि भाजपा तसेच भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या विद्यमाने भाजपा नेते निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त ही बीच व्हॉलीबॉल स्पर्धा घेण्यात आली.

तुळशीदास गोवेकर आणि दत्ताराम केळूसकर यांच्या हस्ते या स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, आबा हडकर, बंड्या पराडकर, युवा मोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, सौरभ ताम्हणकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेच्या उदघाट्न प्रसंगी बोलताना सौरभ ताम्हणकर यांनी मालवण मध्ये हॉलीबॉल स्पर्धांचे प्रमाण कमी झाल्यामुळे या स्पर्धेशी संबंधित असलेले युवक मागे पडत होते. हे निदर्शनास आल्याने आम्ही चिवला बीच किनारपट्टीवर बीच हॉलीबॉल स्पर्धा घेतली असून आगामी काळात देखील ही स्पर्धा सातत्याने घेतली जाईल, अशी ग्वाही दिली. सुदेश आचरेकर यांनी सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या बीच व्हॉलीबॉल स्पर्धेच्या आयोजनाचे कौतुक केले. सौरभ सारखे युवक सामाजिक क्षेत्रात पुढे आले पाहिजेत. चिवला बीच परिसराचा आज सर्वांगीण विकास झाला आहे. या ठिकाणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या सत्ताकाळात बंधाराकम रस्ता उभा केला. त्यामुळे येथील पर्यटनात वाढ झाल्याचे सांगून येथील उपक्रमांसाठी आम्ही पाठीशी आहोत अशी ग्वाही दिली.

स्पर्धेत ओजास फायटर रत्नागिरी संघाने विजेतेपद मिळवले. त्यांना ११,१११ रुपये आणि चषक तर उपविजेत्या चिवला बीच संघाला ५,५५५ रुपये आणि चषक देण्यात आला. बेस्ट स्म्याशर – साहिल कुवार (रत्नागिरी), बेस्ट लिफ्टर – ओंकार रेडकर (चिवला बिच) यांना पारितोषिक देण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून अजित जगदाळे, श्री. घोरपडे सर आणि श्याम वारंग यांनी काम पाहिले.

यावेळी निशय पालेकर, राकेश सावंत, कुणाल खानोलकर, मयू पारकर, विशाल गोवेकर, फ्रान्सिस फर्नांडिस, चेतक पराडकर, कर्विन फर्नांडिस, जॉन्सन फर्नांडिस, प्रथम सारंग, प्रेम वेंगुर्लेकर, जॉन्टी फर्नांडिस, अक्षय मिठबावकर, निकीत वराडकर, अक्षय मोर्जे, सिद्धेश पाताडे, निशांत जोशी, करुण खोर्जे, चंद्रकांत मयेकर, विनायक रेडकर, राज कांदळकर, गौरव लुडबे, शुभम मुळेकर, कैतान सोज, प्रवीण शिर्सेकर, मतीश मयेकर, पवन शिर्सेकर, तुषार वाघ, जलेंद्र करंगुटकर यांच्यासह अन्य सहकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.