भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

Google search engine
Google search engine

माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या माध्यमातून भाजी विक्रेत्या महिलांना धान्य वाटप

न.प समोर पोलीसांसाठी उभारण्यात आलेल्या निवारा शेडचे उद्घाटन

सावंतवाडी । प्रतिनिधी : भाजपचे प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांचा वाढदिवस
भाजपचे जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवत साजरा करण्यात आला. या निमित्त सावंतवाडी शहरातील भाजीविक्रेत्या महिलांना धान्य वाटप करण्यात आले.
तर ऊन पाऊस झेलत नगरपालिकेसमोर उभे असणाऱ्या वाहतूक पोलिसांसाठी भाजपा अल्पसंख्यांक सेलचे पदाधिकारी रफिक शेख यांच्या माध्यमातून उभारून देण्यात आलेल्या निवारा शेडचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी भाजपचे शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, माजी नगरसेवक आनंद नेवगी, माजी नगरसेवक मनोज नाईक, शहर उपाध्यक्ष दिलीप भालेकर, गुरु मठकर, सत्यवान बांदेकर, केतन आजगावकर, समीर पालव आदी उपस्थित होते.