मसुरे | झुंजार पेडणेकर
ग्रामपंचायत गोळवण-कुमामे-डिकवल च्या वतीने भारतीय जनता पक्ष, राज्य प्रदेश सचिव तथा माजी खासदार श्री. निलेश राणे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष श्री. अशोक सावंत यांच्या मातोश्री श्रीम. सुलोचना वासुदेव सावंत यांच्या हस्ते यावेळी केक कापण्यात आला. गोळवण-कुमामे-डिकवल सरपंच श्री. सुभाष लाड, उपसरपंच श्री. साबाजी गावडे, घुमडे उपसरपंच राजेश सावंत, गोळावण ग्रा. पं. सदस्य श्री. शरद मांजरेकर, श्री. विरेश पवार, सौ. प्राजक्ता चिरमुले, सौ. मेघा गावडे, तसेच ग्रामस्थ श्री. भाई चिरमुले, श्री. मुरारी गावडे, श्री. सुनिल गावडे, श्री. सुरेश गावडे, श्री. दिपक गावडे, श्री. एकनाथ गावडे, श्री. गोपाळ गावडे, श्री. विनायक गावडे, श्री. दिगंबर गावडे, श्री. हरिश्चंद्र गावडे, श्री. वासुदेव गावडे, श्री. सदानंद गावडे, श्री. कृष्णा गावडे, श्री. प्रभाकर गावडे, श्री. मनोहर गावडे-डिकवल, ग्रा. पं. कर्मचारी श्री. बाळाराम परब, श्री. रामकृष्ण नाईक, श्रीम. करुणा राणे, श्री. दत्ताराम परब आदी उपस्थित होते.