रत्नागिरी : मोठ्या भावाने गरजू रूग्णाला प्लेटलेटस दान करून मानलेल्या बहिणीचा वाढदिवस उत्साहात साजरा केला. सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार निलेश कोकमकर हे मुळचे चिपळूण तालुक्यातील असून मुंबई उपनगरात वास्तव्याला आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील दिशा रणदिवे ही त्यांची मानलेली बहीण आहे. दिशा रणदिवे हिच्या वाढदिवसानिमित्त निलेश कोकमकर यांनी गरजू रूग्णाला प्लेटलेटस दान करून आपल्या बहिणीचा वाढदिवस साजरा केला.