रत्नागिरी | प्रतिनिधी : महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेतर्फे लेखक व ज्येष्ठ ॲड. विलास पाटणे लिखित न्या. रामशास्त्री प्रभुणे पुस्तक महाराष्ट्रातील सर्व वकील संघटनाना प्रदान करणेचा कार्यक्रम सर्वोच्च न्यायालयाचे न्या अभय ओक यांचे प्रमुख उपस्थितीत होत आहे .
या प्रसंगी वकील परिषदेचे अध्यक्ष ॲड मिलिंद पाटील , उपाध्यक्ष ॲड संग्राम देसाई बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य ॲड जयंत जायभावे उपस्थित राहणार आहेत .कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन वकील परिषदेचे सदस्य ॲड गजानन चव्हाण तसेच ठाणा जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड प्रशांत कदम यांनी केले आहे
” शास्त्रानुसार न्याय होईल , निरपेक्ष न्यायाला नाती मंजुर नसतात “या नात्याने निवाडा करणारे न्या रामशास्त्री यांनी मराठी दौलतीचे सर्वसत्ताधिष राघोबादादा याना देहान्त प्राय शित्ताची शिक्षा देवून निःपक्षपाती व निर्भिड न्यायदानाच्या मापदंड अधोरेखित केला .
सर्वोच्च न्यायालयाचे न्या .अभयजी ओक या पुस्तकाला दिलेल्या अभिप्रायात म्हणतात ” रामशास्त्री कोण होते त्यापेक्षा रामशास्त्री बाणा म्हणजे काय हे नव्या पिढीला कळणे महत्त्वाचे आहे ते सांगण्याचे काम या पुस्तकाने केले आहे ”
अलीकडेच रामशास्त्री पुस्तकाचा माजी केंद्रीय कायदामंत्री ॲड रमाकांत खलप यांनी केलेल्या इंग्रजी अनुवादाचा प्रकाशन समारंभ न्या महेश सोनक यांचे उपस्थितीत गोव्यात संपन्न झाला होता .
पुस्तक प्रदान कार्यक्रम येत्या बुधवार दिनांक २२ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता टाऊन हॉल जिल्हाधिकारी ऑफिस जवळ, ठाणा ययेथे होणार आहे.