मसुरे | झुंजार पेडणेकर
दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गच्या वतीने धम्म जागृती अभियानांतर्गत रविवार, १९ मार्च रोजी सकाळी ११ वा. धम्म प्रबोधनाचे आयोजन शिवडाव बौद्धवाडी येथे करण्यात आले आहे. धम्म चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी, साध्यासोप्या भाषेत बुद्धधम्माची आजच्या काळातील गरज लक्षात घेवून प्रबोधनात्मक यथार्थ मांडणी करणारे हे प्रबोधन असणार आहे.
दर्पण प्रबोधिनीचे अध्यक्ष आनंद तांबे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार असून ‘सध्दम्माची समकालीन प्रस्तुती’ याविषयावर प्रा. डॉ. अमर कांबळे यांचे व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाला विद्रोही कवी, ज्येष्ठ
निवेदक राजेश कदम, दर्पण प्रबोधिनीचे उपाध्यक्ष नरेंद्र तांबे, प्रज्ञा कदम, सहसचिव संदेश कदम, दर्पण महिला फ्रंटच्या अध्यक्षा स्नेहल तांबे, उपाध्यक्षा संजना तांबे, शिवडाव बौद्ध विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष सचिन तांबे, शिवडाव बौद्ध अध्यक्ष तारक तांबे यांच्यासह दर्पण कार्यकारिणी व सदस्य, सल्लागार, दर्पण महिला विकास मंडळ गाव शाखेचे, दर्पण स्टुडंट फ्रेडरेशन आदी उपस्थितीत राहणार
या कार्यक्रमाला परिवर्तनशिल चळवळीतील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन दर्पण प्रबोधिनीचे सचिव सुभाष कदम यांनी केले आहे.