हक्काविषयी प्रत्येक महिलेने जागरूक रहावे!

अॅड समृद्धी म्हाडगुत यांचे प्रतिपादन

सेवांगण कट्टा येथे सावित्रीबाई पुण्यतिथी साजरी

मसुरे | झुंजार पेडणेकर

बॅ नाथ पै सेवांगण कट्टा यांच्या वतीने सावित्रीबाई फुले पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न झाला
नितीन वाळके यानी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाचा सखोल आढावा घेतला.
अॅड समृद्धी म्हाडगुत यानी महिलानी स्वतः सक्षम होवून आपला विकास करणे आवश्यक आहे. प्रत्येक महिलेला किमान कायदे विषयक ज्ञान अवगत असायला हवे. आपल्या हक्काविषयी प्रत्येक महिलेने जागरूक असायला हवं असे प्रतिपादन करून सेवांगण त्यासाठी अनेक उपक्रम राबवीत आहे त्याचाही लाभ सर्वानी घ्यावा असे आवाहन केले
सायली चव्हाण यानी महिलांच्या उपस्थिती बद्दल समाधान व्यक्त केले ग्रामीण भागातल स्त्री असेल त्या स्थितीत
विविध स्पर्धात सहभागी होत आहे आनंद घेत आहे याचे कौतुक करून महिलानी आपल्या मुलाना सर्वांगिण प्रगती साठी सक्षम करावे असे प्रतिपादन केले.
यावेळी लक्ष्मीकांत खोबरेकर यानी कट्टा शाखेच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले
प्रियांका भोगटे यानी मनोगत व्यक्त केले.
या वेळी वेशभूषा स्पर्धा व पाककला स्पधेतील विजेते व सहभागी महिलांचा प्रशस्ती पत्रक व भेटवस्तू वेऊन मान्यवरांचे हस्ते गौरव करण्यात आला

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बाळ नांदोसकर व वैष्णवी लाड यानी केले
या कार्यक्रमास
किशोर शिरोडकर, बापू तळावडेकर, दीपक भोगटे, मधुरा माडये, गीता नाईक, हरेश चव्हाण, सुनील चव्हाण, सुजाता पावसकर, परिसरातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.