जिद्द शाळेत भाजपा प्रदेश सचिव व माजी खासदार खासदार निलेश राणे यांचा वाढदिवस साजरा

चिपळूण | संतोष सावर्डेकर : कोवॅस संस्थेच्या जिद्द मतिमंद मुलांच्या शाळेत भाजपा प्रदेश सरचिटणीस व माजी खासदार निलेश राणे यांचा व जिद्द शाळेतील, जयदीप मोने उद्योग केंद्रातील विद्यार्थ्यांचा मार्च महिन्यातील वाढदिवस मोठया उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाला भाजप चिपळूण शहराध्यक्ष आशिष खातू, माजी नगरसेवक परिमल भोसले, चिपळूण अर्बन बँकेचे संचालक रत्नदीप देवळेकर, देवखेरकी गावचे उपसरपंच गणेश हळदे, सचिन शिंदे, श्री. व सौ. वरवाटकर, श्री. रहाटे, कोवॅस संस्थेच्या सचिव सुमती जांभेकर, जिद्द शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप दिवाडकर, जयदीप मोने उद्योग केंद्राचे व्यवस्थापक प्रशांत कोतळुककर, पालक, विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थीत होते.

जिद्द शाळेतील विशेष शिक्षक उमेश कुचेकर यांनी पाहुण्यांची ओळख करुन दिली. त्यानंतर त्यांनी भाजपा प्रदेश सचिव व माजी खासदार निलेश राणे यांच्या कामांचा आढावा घेतला. त्यावेळी सर्वानी त्यांच्या कामाची पोचपावती टाळया वाजवून दिली.

जिद्दच्या सचिव श्रीमती सुमती जांभेकर यांनी आपल्या मनोगतात, संस्था कशी चालते व संस्थेसाठी निलेश राणेंनी केलेल्या मदतीचा उल्लेख करुन अशीच मदत करण्याची विनंती केली.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते निलेश राणे व जिद्द शाळेतील व जयदीप मोने उद्योग केंद्रातील विद्यार्थ्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला व ज्यांचा वाढदिवस होता त्या बहुतांश विद्यार्थ्यांना मनोभावे शुभेच्छा दिल्या व आपुलकीने केक भरविला.

जिद्द शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप दिवाडकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच जयदीप मोने उद्योग केंद्राला आवश्यक असणा-या बाबींचा उल्लेख करुन त्याचा पाठपुरावा करुन त्या वस्तु मिळवून देण्याचा प्रयत्न करावा अशी विनंती केली. तसेच राणे यांनी जिद्द शाळेच्या परिसरातील पुरामुळे पडलेली संरक्षण भिंत लवकरच दुरुस्त करुन दिली. त्यामुळे त्यांचे आभार व्यक्त केले. नगरपालिकेने जिद्द शाळेसाठी, संस्थेसाठी, फिजिओथेरपीसाठी व लिफ्टसाठी भरघोस निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांचे मनोमन आभार मानले व पुढे अशीच मदत करा अशी विनंती केली.

कोवॅसच्या सचिव श्रीमती सुमती जांभेकर यांनी संस्थेची माहीती सांगितली व दानशुर व्यक्ती संस्थेला मदत करतात, त्यामुळे संस्थेचे कामकाज छान चालते. अशीच संस्थेला मदत करावी अशी विनंती केली. चिपळूण भाजप चिपळूण शहराध्यक्ष व माजी नगरसेवकआशिष खातू, माजी नगरसेवक परिमल भोसले आपल्या मनोगतात म्हणाले की, आम्ही आतापर्यंत शाळेला संस्थेला मदत करीत आलो आहे. यापुढेही तुम्हांला कशाची गरज लागेल ती आम्हांला सांगा, आम्ही ती गरज पूर्ण करु अशी ग्वाही दिली.

उपस्थित मान्यवरांनी वाढदिवसानिमित्त मुलांना कोल्ड्रींक्स, बिस्कीट पुडे, आरसा, घडयाळे इ. सचिव सुमती जांभेकर, मुख्याध्यापक प्रदीप दिवाडकर यांचेकडे सुपूर्त केली. जयदीप मोने उद्योग केंद्रातील मुलांनी बनविलेला कागदी गुलाब पुष्पांचा बुके व भेटकार्ड देऊन ही आमची भेटवस्तु व आमच्या शुभेच्छा निलेश राणे यांच्यापर्यंत पोहचवा अशी विनंती सुमती जांभेकर यांनी केली.