भार्गवी सुर्वे हिचा सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून गौरव
लांजा | प्रतिनिधी : संस्कृती फाउंडेशन लांजा निर्मित राजेश गोसावी लिखित व दिग्दर्शित मयुरी या समाजप्रभोधनपर लघुपटाचे कोल्हापूर येथे झालेल्या कलानगरी कोल्हापूर फिल्म फेस्टिवलमध्ये ज्युरी आणि रसिक प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक झाले. तर मयुरी ही भूमिका साकारणाऱ्या भार्गवी सुवे हिला सर्वोत्कृष्ट बालकलाकर म्हणून गौरविण्यात आले.तर संपूर्ण मयुरी टीमचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.आरोग्य फिल्म फेस्टिवल पुणे नंतरचे हे या लघुपटाचे दुसरे यश आहे.भगवान क्रियेशन्स व राजश्री क्रियेशंन्स यांनी हा फेस्टिवल आयोजित केला होता.या फेस्टिवलमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील विजय कदम,समृद्धी पोरे महादेव साळोखे, शिरीष राणे यांसह अनेक दिग्गजानी हजेरी लावली होती.देशभरातून चित्रपट ,लघुपट व वेबसिरिज या फेस्टिवलमध्ये दाखवल्या गेल्या.
मयुरी ही फिल्म लहान मुलांवरील अत्याचार या विषयावर आधारित असून पालक समाज यांना उपयुक्त अशी दिशा देणारी फिल्म आहे.यामध्ये राजेश गोसावी भार्गवी सुर्वे अतुल शिर्के,दुर्वा रावणांग, स्वप्नील धनवाडे,श्रीकांत बोंबले,राजाभाऊ मोरे दत्ताराम घडशी आदी कलाकारांनी यामध्ये भूमिका केल्या आहेत. यातील मयुरी ही भूमिका साकारणाऱ्या भार्गवी सुवे हिला सर्वोत्कृष्ट बालकलाकर म्हणून गौरविण्यात आले. लेखक-दिग्दर्शक राजेश गोसावी व भार्गवी सुवे यांनी हा पुरस्कार स्विकारला.सदर यशाबद्दल संस्कृती फाउंडेशन संस्थापक राजेश गोसावी अध्यक्ष गौतम कांबळे उपाध्यक्ष संतोष म्हेत्रे सचिव विनोद बेनकर संघटक प्रियवंदा जेधे सिद्धेश पांचाळ स्पर्धाप्रमुख राहुल तोडकरी सह सर्व पदाधिकारी सदस्य यांनी अभिनंदन केले आहे.