संपाच्या सातव्या दिवशी थाळीनाद खणखणला!

Google search engine
Google search engine

सिंधुदुर्ग | प्रतिनिधी : राज्य सरकारी ,निमसरकारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने पुकारलेल्या जुन्या पेन्शनच्या मागणीसाठीच्या संपाच्या सातव्या दिवशी कर्मचाऱ्यांनी गाणी पोवाडे म्हणून थाळीनाद करत जिल्हा मुख्यालय परिसर दणाणून सोडला. समन्वय समितीचे अध्यक्ष राजन कोरगावकर व सचिव सत्यवान माळवे यांनी सुरुवातीला संपाची सद्यस्थिती विशद करून पुढील काही दिवसांची आंदोलन विषयी नियोजन स्पष्ट केले.संपकऱ्यांनी ‘एकच मिशन,जुनी पेन्शन’ सह विविध घोषणा दिल्या.तसेच आजच्या दिवशी थाळीनाद आंदोलन दणक्यात करण्यात आले.संपकऱ्याना के.टी.चव्हाण,म.ल.देसाई,एस.एल.सपकाळ यांचेसह काही नेत्यांनी मार्गदर्शन केले.विविध चालीवर जुन्या पेन्शन मिळविण्याच्या गाणी,पोवाडे,गजर थाळी नाद सह सादर करण्यात आल्याने आजचा दिवस लक्षवेधी ठरला.समन्वय समितीचे अध्यक्ष राजन कोरगावकर यांनी नोकरी गेली तरी बेहत्तर पण आता मागे हटायचे नाही,सर्वांनी अखेरच्या निकराच्या लढाईला तयार रहावे असे संपकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.