खेड(प्रतिनिधी) सहजीवन शिक्षण संस्था संचलित आय.सी.एस. महाविद्यालयास सुरत येथील शिठ तापीदास व तुलसीदास ब्रजदास चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने २ हजार वह्यांची शैक्षणिक साहित्यांची देणगी देण्यात आली. प्राचार्या डॉ. अनिता आवटी यांच्याहस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण किरण्यात आले.
ग्रंथपाल राजेश राजम यांनी प्रास्ताविकात संस्था, महाविद्यालय, लाभार्थी विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या
वतीने देणगीदार ट्रस्टचे आभार मानले. याप्रसंगी रसायनशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. एस. के. घुंबरे, इंग्रजी विभागप्रमुख डॉ. बी. जी. यादव आदी उपस्थित होते.
संस्था कार्याध्यक्ष मंगेश बुटाला, महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन अॅड. आनंद भोसले यांनी लेखी पत्राद्वारे टस्टचे आभार मानले. शैक्षणिक साहित्याची देणगी मिळवण्यासाठी डॉ. राजेश राजम, डी. एम. शिंदे यांनी प्रयत्न केले. डॉ. सचिन सागर यांनी आभार मानले.












