महिलानी आरोग्य साक्षर व्हावे – डॉ. अक्षता सप्रे

Google search engine
Google search engine

आम्ही सिद्ध लेखिका व कोकण मराठी साहित्य परिषद शाखा रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने काल महिला दिन विशेष साहित्यिक कार्यक्रम साजरा झाला. यावेळी आम्ही सिद्ध लेखिका कोकण विभाग प्रमुख सौ. सुनेत्रा जोशी कार्याध्यक्षा सौ. ऋतुजा कुळकर्णी कोमसाप केंद्रीय अध्यक्षा सौ. नमिता कीर, रत्नागिरी शाखा अध्यक्षा सौ. तेजा मुळ्ये व प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. अक्षता सप्रे उपस्थित होत्या.या कार्यक्रमात डॉ. अक्षता सप्रे यांनी महिलांचे आरोग्य याविषयक ओघवत्या वाणीमध्ये बहुमूल्य मार्गदर्शन केले. आम्ही सिद्ध लेखिका मधील ज्येष्ठ साहित्यिका सौ. लता जोशी व दोन्ही संस्थांची सभासद असणाऱ्या सौ. आकांक्षा भुर्के यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पुरस्कारप्राप्त सौ. नमिता कीर कोमसाप केंद्रीय अध्यक्ष यांचा सत्कार आम्ही सिद्ध लेखिका रत्नागिरी अध्यक्ष सौ. सुनेत्रा विजय जोशी यांच्या हस्ते करण्यात आला.

यानंतर काव्यवाचनाचा बहारदार कार्यक्रम झाला. त्यामधे सौ. आकांक्षा भुर्के, सौ. राधिका आठल्ये, सौ. शमा प्रभुदेसाई, सौ. अनुराधा दीक्षित, सौ. लता जोशी, सौ. अर्चना देवधर, सौ. सरिता प्रशांत गोखले, कुंदा भालचंद्र बापट, अनुप्रिता कोकजे व सौ. ऋतुजा कुळकर्णी यांनी विविध शैलीतल्या, वेगवेगळे विचार व्यक्त करणाऱ्या , हृदयस्पर्शी गझल व कविता सादर केल्या. या कार्यक्रमाला श्री. दादा कदम कोमसाप उपाध्यक्ष तसेच डॉ. विजय जोशी यांची विशेष उपस्थिती होती.यानंतर कोमसाप केंद्रीय अध्यक्षा सौ. नमिता कीर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. आकांक्षा भुर्के यांनी केले.अतिशय उत्साहात कार्यक्रम पार पडला..ही माहिती आम्ही सिद्ध लेखिका रत्नागिरी कडून देण्यात आली…