सिंधुदुर्ग क्रिकेट संघाचा पीएमपी संघावर एकतर्फी विजय

Google search engine
Google search engine

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित निमंत्रितांची स्पर्धा

सावंतवाडी । प्रतिनिधी :

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित निमंत्रितांच्या साखळी स्पर्धेत खुल्या गटातील सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या संघाचा सामना पुणे येथील पीएमपी या संघाबरोबर दापोली येथील मैदानावर संपन्न झाला. हा सामना सिंधुदुर्ग जिल्हा संघाने नऊ गडी राखून जिंकला.

प्रथम फलंदाजी करताना पीएमपी संघ प्रथमेश गावडेच्या अप्रतिम वेगवान गोलंदाजीमुळे केवळ ११८ धावातच गारद झाला. प्रथमेश गावडेने ३५ धावात ७ तर नितेश काळे ने ११ धावा देऊन २ गडी बाद केले

नंतर फलंदाजी सुतरलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशन संघातील आयपीएल व महाराष्ट्राचा खेळाडू निखिल नाईक यांच्या ७१ धावा नागेश रेगेच्या ३३ प्रथमेश गावडे च्या ३४ धावा तसेच रघुवीर सातोस्करच्या २२ धावांच्या जोरावर २२७ धावा केल्या.

पुन्हा फलंदाजीस उतरलेल्या पीएमपी संघाचा प्रथमेश गावडे ४२ धावत तीन बळी नितीश काळे पाच धावाच दोन बळी निखिल नाईक पाच धावा दोन बळी तसेच नागेश रेगे बारा धावत २ बळी यांच्या गोलंदाजी समोर केवळ ११२ धावातच गारद झाला.

जिंकण्यासाठी चार धावांचे लक्ष घेऊन उतरलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा संघाने एका गड्याच्या मोबदल्यात हे लक्ष पार करून या स्पर्धेच्या फ गटामध्ये चार सामन्यात २२ गुण कमवून प्रथम स्थान प्राप्त केले आहे.

कर्णधार सर्वेश नाईकच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या संघाने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी केलेली आहे. संघातील प्रमुख खेळाडू निखिल नाईक यांनी २०० धावा केल्या. तर डावखुरा फिरकी गोलंदाज नितीश काळे यांनी २१ गडी गारद केले तर जलद गती गोलंदाज प्रथमेश गावडे याने १९ गडी बाद केले.

संघाच्या या यशाबद्दल संघाचे व्यवस्थापक रघुनाथ धारणकर, सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मंदार नार्वेकर तसेच समिती सदस्य व पदाधिकारी यांनी या संघाचे अभिनंदन केले. दरम्यान, संघाचा पुढील सामना सहारा क्रिकेट क्लब बरोबर रत्नागिरी येथील कोळंब येथे २२ व २३ रोजी होणार आहे.

Sindhudurg