रत्नागिरी : ऍड.महेंद्र वसंत मांडवकर यांची भारतीय जनता पार्टी रत्नागिरी जिल्हा (दक्षिण) कायदा आघाडी प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आणि वकिली व्यवसायाची 15 वर्ष पूर्ण झाली म्हणून रत्नागिरी मधिल प्रसिद्ध आंबा व्यापारी भुपेश उर्फ बंधू भाटकर यांनी कार्यालयात येऊन सत्कार केला.
त्यावेळी मालगुंड गावचे प्रतिष्ठित असामी श्री.मंगेश साळवी, अनिरुद्ध साळवी, रत्नागिरी मधिल प्रसिद्ध व्यापारी श्री अशोक वाळंबे व त्यांच्या पत्नी, प्रसिध्द बिल्डर महावीर जैन, श्री व सौ दादा नारकर, शिरगाव येथील प्रसिद्ध आंबा व्यापारी सुरेश शेट्ये व त्यांचे चिरंजीव सिद्धी शेट्ये आणि बंधू भाटकर यांचे अनेक मित्र मंडळी उपस्थित होते.