चवदार तळे सत्याग्रह दिनाचे निमात्ताने रिपाइंचे वतीने मंडणगड ते महाड बाईक रँली

मंडणगड | प्रतिनिधी : रिपब्लकीन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) तालुका शाखा मंडणगड यांच्यावतीने 20 मार्च 2023 रोजी चवदार तळे सत्याग्रह दिनाचे औचीत्यसाधून मंडणगड ते महाड बाईक रँलीचे आयोजन करण्यात आले होते. रिपाइंचे जिल्हा सरचिटणास आदेश मर्चंडे व दलित मित्र दादासाहेब मर्चंडे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो युवक आपल्या दुचाकी गाड्या घेऊन या रँलीत सहभागी झाले. दुपारी 4.00 वाजता शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे आवारातुन बाईक रँली महाड चवदार तळे या ठिकाणी जाण्यासाठी मार्गस्थ झाली. महाड येथे जावून सर्व कार्यकर्ते चवदार तळ्यास भेट देऊन बाबासाहेबांचे व त्यांनी दलित समाजाकरिता या लढ्याच्या माध्यामातून सुरु केलेल्या आंदोलनाचे या निमीत्ताने स्मरण करणार आहेत. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी महाड येथील ऐतिहासीक चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता. त्या घटनेस यंदा 96 वर्षे पुर्ण झाली आहेत. बाईक रँलीत रिपाइंचे तालुका अध्यक्ष नागसेन तांबे, सरचिटणीस रामदास खैरे, विजय खैरे, सुनील तांबे, संकेत तांबे, संदीप येलवे, विधान पवार, मुराद तांडेल, सुशांत खैरे, गौरव मर्चंडे, संकेश कासारे,निलेश मर्चंडे, सुमित साळवी, जयेश साळवी, शरद साळवी, रोशन धोत्रे, प्रणित खैरे, सुमित पवार, रोहीत कासारे, मनोज कासारे, भाई कासारे या मुख्य पदाधिकाऱ्यांसह शेकडो युवा कार्यकर्ते सहभागी झाले.