मंडणगड नगर पंचायत स्थापनादिनाचे निमीत्ताने नगर पंचायतीत विविध उपक्रमांचे आयोजन

Google search engine
Google search engine

मंडणगड | प्रतिनिधी : नगरपंचायतीचे स्थापना दिनाचे निमीत्त साधून 19 मार्च 2023 रोजी मंडणगड नगर पंचायतीचे कार्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमीत्ताने नगरंपाचयात कर्मचाऱ्यांनी नगरसेवकांच्या उपस्थितीत राष्ट्र गीत व राज्य गीतांचे सामुहीक गायन केले. यांनतर सत्यनारायणाची महापूजा, शहरातील दिव्यांग बांधवासाठी नगर पंचायतीचे अपंग कल्याण निधीचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे निमीत्ताने आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 आंर्तगत महाराष्ट्र मिलेट मिशन जागृती अभियानाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमात इस्त्रो युवा शास्त्रज्ञ अभियानात निवड झालेल्या शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय शहरात बेकारीला आग लागल्याची घटना नुकतीच घडलेली असताना यावेळी प्रसंगावधान राखून पोलीस व प्रशासनास वेळीच माहीती देवून मोठा घातपात टाळणाऱे रिक्षाचालक बिलाल याचा ही गौरव करण्यात आला. मुख्याधिकारी विनोद दवले, प्रशासकीय अधिकारी अभिजीत राणे, नगराध्यक्षा सौ. सोनल बेर्डे, उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे, विरोधी पक्ष गटनेते विनोद जाधव यांच्यासह सर्व नगरसेवक कर्मचाऱ्यांनी स्थापना दिनी आयोजीत उपक्रमात सहभाग नोंदविला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याधिकारी विनोद दवले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.