वेंगुर्ले : प्रतिनिधी
होळी पौर्णिमेपासुन पंधरा दिवसांनी साजरा होणारा वेंगुर्ले येथिल शिमगोत्सव आज मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी होणाऱ्या या रंगोत्सवात अबालवृद्धांसह महिलांनीही उत्स्फुर्त सहभाग घेत सप्तरंगांची उधळण केली.शिमगोत्सवानिमित्त होळीला नारळ अर्पण करण्यासाठी सर्व वाडीतील ग्रामस्थ आपल्या रोंबटांसह मांडावर येऊन वार्षिक कार्यक्रम पार पडत होते.तर आज शिमगोत्सवाच्या शेटच्या दिवशी शहरात, वाडीत, गल्लोगल्ली तसेच घरोघरी दिवसभर सर्वांनी रंगोत्सव साजरा केला. काही ठिकाणी ढोल ताशे तर काही ठिकाणी डिजे च्या तालावर लोकांनी नृत्याचा आनंद लुटला. संपूर्ण शहर रंगीबेरंगी बनले होते.