रत्नागिरी आगाराकडून सैतवडे एस टी सेवा सूरु

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ रत्नागिरी आगारा कडुन गेली गेली अनेक दिवस बंद असलेली दुपारी तीन वाजता सुटणारी रत्नागिरी सैतवडे एस टी सेवा काल दिनांक 20 मार्च पासून सुरु करण्यात आली आहे,सदर सेवेचा सर्व प्रवासी, विद्यार्थी, वर्गानी लाभ घ्यावा असे आवाहन सैतवडे ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे सदर गाडी रत्नागिरी आगारातून 3वाजता सैतवडे येथून 5वाजता सुटेल काल संध्याकाळी पेठ मोहल्ला येथे एसटी गाडीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले सामाजिक कार्यकर्ते शुकुर चिलवान यांच्या हस्ते नारळ फोडून या गाडीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी रत्नागिरीहून या गाडीबरोबर माझी पोलीस पाटील इब्राहिम मुल्ला, सामाजिक कार्यकर्ते अजिज मुकादम, पत्रकार जमीर खलफे यांनी प्रवास केला. पेठ मोहल्ला स्टॉप जवळ गाडीचे स्वागत करण्याकरिता अजित मुल्ला, अकबर पागरकर,शफी चिकटे, फैयाज कापडे,
शीराज कापडे , सैतवडे माजी सरपंच सदाशिव पवार इत्यादी लोक उपस्थित होते. एसटीचे वाहक व चालक यांना श्रीफळ देऊन एसटी चालू करण्यात आली.