होणार पालखी परिक्रमा,स्वामींच्या चरित्र सारामृताचे वाचन,सामुदायिक नामस्मरण
कणकवली | प्रतिनिधी : कणकवली कलमठ येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात श्री स्वामी समर्थ जयंती उत्सव प्रति वर्षाप्रमाणे २३ मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे.जयंती उत्सवाचे हे २९ वे वर्ष असून या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे , पालखी परिक्रमा,सामुदायिक नामस्मरण,पारायण व स्वामींच्या चरित्र सारामृताचे वाचन केले जाणार आहे.२३ मार्च रोजी सकाळी ९ वाजता गुरु पूजन ११ वाजता सामुदायिक नामस्मरण व आरती, १२ वाजल्यापासून महाप्रसाद, सायंकाळी ४ ते ७ वाजेर्यंत श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत व सामुदायिक पारायण केले जाणार आहे. रात्री ८ ते १० या वेळेत पालखी परिक्रमा,नृत्य भजन होणार आहे. श्री देवी भगवती प्रासादिक भजन मंडळ चींदर भटवाडी यांचे नृत्य भजन सादर होणार आहे. या दरम्यानच रात्री ८ ते ११ या वेळेत महाप्रसाद सुरू दिला जाणार आहे. स्वामी समर्थ चरित्र सारामृत व सामुदायिक पारायण करण्यासाठी जे भाविक सहभागी होणार आहे त्यांनी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.त्यासाठी ९४०३३५१८९२ या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले. तर या संपूर्ण कार्यक्रमात सर्व भाविकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने श्री भाई मेस्त्री यांनी केले आहे.












