देव, घैसास, कीर महाविद्यालयाच्या ज्ञानरुप वार्षिक अंकाचे व झेप हस्तलिखिताचे प्रकाशन

रत्नागिरी – भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात सोमवारी ज्ञानरूप वार्षिक अंक ( २०२१-२२) व झेप हस्तलिखित( २०२२-२३) चे प्रकाशन सिद्धार्थ सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी ज्ञानरूप व हस्तलिखित विभागप्रमुख, संपादिका सौ. वसुंधरा जाधव यांनी प्रास्ताविक केले. या झेप हस्तलिखिताला महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवला. संस्था पदाधिकारी, प्रभारी प्राचार्या सौ.मधुरा पाटील, ज्ञानरूप व हस्तलिखित विभागप्रमुख उपप्राचार्या सौ. वसुंधरा जाधव, ज्ञानरूप विभाग शिक्षक मंडळ सौ.अनन्या धुंदूर, प्रा. राखी साळगावकर, प्रा. विनय कलमकर, प्रा. दीप्ती कदम, प्रा. दिपाली डाफळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. हस्तलिखित ‘झेप’ २०२२-२३ साठी हस्तलिखित मंडळाचे शिक्षक सौ. अनन्या धुंदूर, प्रा. कस्तुरी मोहितं यांचे सहकार्य लाभले. विद्यार्थी प्रतिनिधी प्रतीक माटेल याने ज्ञानरूप साठी मोलाचे सहकार्य केले. हस्तलिखितासाठी द्वितीय वर्ष वाणिज्य शाखेच्या प्रचिती शिंदे हिने मुखपृष्ठ व तृतीय वर्ष वाणिज्य शाखेच्या प्रियांका साखरपेकर हिने मलपृष्ठ निर्मिती केली. मानसी धुमाळ, निधी डोंगरे, आदिती पवार, आकांक्षा वेतोस्कर, धनश्री साळवी या विद्यार्थीनींनी हस्तलिखितासाठी मदत केली. प्रकाशन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अनन्या धुंदूर यांनी केले तर प्रा. दिप्ती कदम यांनी आभार मानले.