रत्नागिरी | प्रतिनिधी: रत्नागिरी जिल्हा कन्झ्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रिब्युशन फेडरेशनच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून अन्वर मेमन यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्हा कन्झ्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रिब्युशन फेडरेशनच्या नूतन कार्यकारिणीची बैठक नुकतीच घेण्यात आली. या बैठकीत फेडरेशनची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष म्हणून अन्वर मेमन यांची तर उपाध्यक्ष म्हणून नितीन तलाठी यांची निवड करण्यात आली. सेक्रेटरीपदी तुषार मलुष्टे यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रत्नागिरी जिल्हा कन्झ्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रिब्युशन फेडरेशनचे माजी अध्यक्ष आनंद देवस्थळी यांनी केले.
खजिनदारपदाची जबाबदारी महेश चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली आहे. फेडरेशनच्या या नव्या कार्यकारिणीचा जुन्या कार्यकारिणीचे पदाधिकारी सुहासभाऊ पटवर्धन, सुधीर मलुष्टे, सतीश दळी आणि नाना देवळेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
फेडरेशनचे माजी पदाधिकारी सुहासभाऊ पटवर्धन यांना पुणे चेंबर ऑफ कोमर्सचा आदर्श व्यापारी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल रत्नागिरी जिल्हा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स डिस्ट्रिब्युशन फेडरेशनतर्फे त्यांचा गौरव करण्यात आला. व्यावसायिक वाटचालीत येणाऱ्या अडचणींविषयी कल्पना देऊन त्यातून बाहेर पडण्याविषयी सतीश दळी यांनी नूतन कार्यकारिणीसह उपस्थित व्यापाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी झालेल्या चर्चेत फेडरेशनच्या सदस्यांची संख्या वाढवून संघटनेला बळकटी आणण्याचा निश्चय करण्यात आला. ॲड. मनोहर दळी यांनी या बैठकीचे सूत्रसंचालन केले.