रत्नागिरी : शहरातील नामवंत डॉ. सुनील औरंगाबादकर यांची पत्नी व स्त्रीरोग तज्ञ डॉ. अंजनी औरंगाबादकर यांची रविवारी सायंकाळी हृदयक्रिया बंद पडल्याने कोल्हापुरातील खासगी रूग्णालयात वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झाले.
शहरातील चिंतामणी हाॅस्पीटलच्या माध्यमातून त्यांनी पती डॉ. औरंगाबादकर यांच्या साथीने हजारो रूग्णांवर उपचार केले. त्यांनी १२ वर्ष जिल्हा रूग्णालयातही सेवा बजावली. दरम्यान प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना १५ दिवसापूर्वी कोल्हापुरातील रूग्णालात दाखल केले होते. त्या ठिकाणी त्यांचे निधन झाले. रात्री त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींनी टिळक आळीतील निवासस्थानी धाव घेतली.
त्यांच्या पश्चात पती डॉ. सुनिल औरंगाबादकर, मुलगा डॉ. चेतन, सून डॉ. तारेकेश्वरी, कन्या डॉ. प्राची सुर्यवंशी, जावई योगेश सुर्यवंशी व नातवंडे असा मोठा परिवार आहे.