Ten special teams for recovery of tax arrears; Campaign of Chiplun Nagar Parishad
चिपळूण | प्रतिनिधी : येथील नगर परिषदेच्या विशेष पथकाने मालमत्ता आणि पाणीपट्टी कर वसुलीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. प्रसंगी कर न भरणाऱ्या नागरिकांच्या सदनिका जप्त तसेच नळ कनेक्शन खंडित करण्याची कारवाई करण्यात आली आहे तरी अजून ३ कोटी मालमत्ता आणि ८० लाख रुपये पाणीपट्टी कर अजून थकीत असून येत्या दहा दिवसात ही कर वसुली मोहीम तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती नगरपरिषदेच्या सुत्रांनी दिली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार चालू घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. गुरुवारपासून १० विशेष पथके थकीत वसुली करणार आहेत. यावेळी कर न भरणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाणार असून घरपट्टी न भरणाऱ्यांच्या सदनिका जप्त तर पाणीपट्टी न भरणाऱ्या नागरिकांचे नळ कनेक्शन खंडित केले जाणार आहेत.
आतापर्यंत कर वसुली मोहीम राबवत असताना
थकीत मालमत्ता कर न भरल्यामुळे केलेली जप्ती ६४ मालमत्ता रक्कम ९० लाख रुपये होते. थकीत पाणीपट्टी कर न भरल्यामुळे खंडी केलेले नळ कनेक्शनधारक १०६ तर यापोटी २२ लाख रुपये रक्कम होती.
भोगाळे येथील एका खंडित नळ कनेक्शन धारकाने नळ कनेक्शन खंडित केले असताना ही स्वतः जोडून चालू करून वापरात आणल्याचे निदर्शनास आले आहे. सदर धारकाला नगर परिषदेने कायदेशीर नोटीस पाठवली आहे.