शोभायात्रेने राजापूरात हिंदु नववर्षाचे स्वागत

Google search engine
Google search engine

Welcoming the Hindu New Year in Rajapur with a procession

राजापूर | वार्ताहर : चैत्र शु.प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्यापासून सुरू होणाऱ्या हिंदू नववर्षाचे राजापूरात हिंदु नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने शोभायात्रा काढून स्वागत करण्यात आले. ढोलताशाच्या गजरात काढण्यात आलेल्या या शोभायात्रेत बहुसंख्य नागरिक पारंपारिक वेषात सहभागी झाले होते.तर पारंपारिक वेषात सहभागी झालेल्या महिलांना पैठणी भेट देण्यात आली.

ग्रामदेवता श्री निनादेवी मंदिर येथुन या यात्रेचा शुभारंभ झाला. धर्मध्वजाचे पूजन होऊन मुख्य रस्ता जवाहरचौक, शिवस्मारक, संभाजीपेठ, मधीलवाडा, गणेशघाट, शिवाजीपथ मार्गे जवाहरचौक अशी ही शोभायात्रा काढण्यात आली. स्वागत यात्रा जवाहरचौक शिवस्मारकाजवळ आल्यावर सौ. व श्री. विश्रामभाई पटेल यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी स्वागतयात्रा समितीचे अध्यक्ष राजेंद्र कुशे, शिवस्मृती मंडळाचे अध्यक्ष दिलीप चव्हाण, अड. प्रशांत पाध्ये आदी उपस्थीत होते.

या शोभायात्रेत राजापूर महिला ढोलपथकाने सहभागी होत उत्सवी रंग भरले. याशिवाय काही नागरिकांनी पारंपारिक वेषभुषा सादर करत शोभायात्रेची शोभा वाढविली. श्री देव चव्हाटा मंदिर येथे महाआरतीने यात्रेची सांगता झाली. या ठिकाणी पैठणी विजेत्या महिलांना पैठणी देवून सन्मानित करण्यात आले.