Leader of opposition group Vinod Jadhav alleged in a press conference that the rulers have blocked the development works of the people through the Standing Committee
मंडणगड | प्रतिनिधी : नगरपंचायतीचे सत्ताधाऱ्यांनी स्थायी समितीच्या माध्यमातून निधी मंजुर असलेल्या सतरा विकासकामे अडवली असल्याचा व याचे विरोधात केलेल्या तक्रारीची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेत आदेश काढून न्याय दिलेला असल्याची माहीती विरोधी पक्ष गट नेते नगरसेवक विनोद जाधव यांनी (23) रोजी मंडणगड नगरपंचायतीत आयोजीत पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी नगरसेवक आदेश मर्चंडे, योगेश जाधव, निलेश सापटे, नगरसेविका सेजल गोवळे, वैशाली रेगे, प्रमिला किंजळे, प्रविण जाधव, निलेश गोवळे उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री. जाधव पुढे म्हणाले सत्ताधारी आपल्या अधिकारांचा गैरवापर करुन मंडणगड नगरपंचायतीचे विरोधी गटातील नगरसेवकांची आमदार योगेश कदम यांनी नगरविकास खात्यांच्या वैशीष्ठपुर्ण योजनेतून मुंजर केलेली 1 कोटी 95 लाखांची व टेंडर प्रोसीजर पुर्ण झालेली 17 कामे नाकारली आहेत. ते अद्याप पुर्ण झालेली नाहीत.
स्थायी समिती आपल्या अधिकारांचा गैरवापर करुन जनतेच्या विकासाची कामे निधी असतानाही रखडवीत असल्याने या संदर्भात चर्चा विनंत्या आर्ज करुन कोणताही फरक न पडल्याने विरोधी गटनेता म्हणून नगरसेवक विनोद जाधव यांनी कलम 308 आंर्तगत जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे 29 नोव्हेंबर 2022 रोजी अपिलात गेले होते. या संदर्भात वादी प्रतिवादी व प्रशासन यांची भुमीका व कागदपत्रांची अभ्यास करुन जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी 17 मार्च 2023 रोजी निकाल दिला आहे. विनोद जाधव यांचे अपील अंशता मान्य करुन 31 मार्च 2023 पुर्वी निधी खर्च होणे कामी संबंधीतांना सुचीत केले आहे. या निकालाची प्रत प्राप्त झाल्याने नगरसेवक विनोद जाधव यांनी सत्ताधाऱ्यांनी विकास कामात राजकारण न आणण्याचे आवाहन केले. स्थायी समितीने विकासकामात राजकारण आणल्याने येथील जनता विकासकामापासून वंचीत राहीलेले असल्याची प्रतिक्रीया देताना जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर प्रशासनाने या संदर्भात योग्य ती कार्यवाही तातडीने करावी अशी मागणी केली आहे. विरोधकांना अडविणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी सत्तेत आल्यापासून किती विकासकामे कामे मंजुर केली आहेत असा सवालही यावेळी उपस्थित केला. सत्ताधारी जनतेची दिशाभुल करीत आहेत मतासांठी जनतेच्या मागे फिरणारे सत्ताधारी जनतेला विसरले आहेत व विकासकामे करण्यापेक्षा विरोधकांनी विकासकामे अडवण्यातच धन्यता मानीत असल्याचा गंभीर आरोप उपस्थित नगरकसेवकांमधून यावेळी करण्यात आला याचबरोबर गावाच्या विकासाकरिता सत्ताधारी व विरोधक हा खेळ खेळण्यापेक्षा एकत्रीत काम करण्याचे व त्याकरिता शक्य ते सर्व सहकार्य करण्याचे आवाहन पत्रकार परिषदेस उपस्थित सर्व नगरसेवकांनी शहर विकास आघाडीच्यावतीने यावेळी केले.