संगमेश्वर : टेनिस क्रिकेट स्पर्धेत श्रीरामेश्वर स्पोर्ट्स क्लब तामनाळे संघ विजेता

Sangameshwar: Srirameshwar Sports Club Tamanale team won the tennis cricket tournament

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील श्री. गांगोबा प्रतिष्ठान, निवेखुर्द संलग्न बेलारी पंचक्रोशी क्रिकेट असोसिएशनतर्फे नवीमुंबईतील ऐरोली येथील मैदानावर घेण्यात आलेल्या भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धेत श्री. रामेश्वर स्पोर्ट्स क्लब तामनाळे संघ अंतिम विजेता ठरला आहे. तर मंगलमुर्ती बेलारी संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले आहे.

संगमेश्वर तालुक्यातील निवेखूर्द, निगुडवाडी, बेलारी, तामनाळे व कुंडी या पाच गावातील तरुणांनी मुंबईत एकत्र येऊन बेलारी पंचक्रोशी क्रिकेट असोसिएशन चार वर्षांपूर्वी स्थापन केली. दरवर्षी श्री. गांगोबा प्रतिष्ठान संस्थेतर्फे क्रिकेट सामने भरविले जात असून विजेत्या संघाला संस्थेकडुन चषक व रोख रक्कम, उपविजेता, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची बक्षिसे देऊन गौरवण्यात येते.

यावर्षी एकूण १६ संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यातुन श्री. रामेश्वर स्पोर्ट्स क्लब तामनाळे या संघाने प्रथम क्रमांक पटकावला तर मंगलमुर्ती बेलारी संघाने द्वितीय क्रमांक मिळवला. बेलारी कदमवाडी व ॐ साई कुंडी संघांनी अनुक्रमे तिसरा व चौथा क्रमांक पटकावला. स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज सुरज गिड्ये व उत्कृष्ट गोलंदाज सुजल सापते व मालिकावीर म्हणून अष्ठपैलु खेळाडु हरेश साप्ते यांची निवड करण्यात आली.

नवीमुंबईतील ऐरोली येथील करण मित्र मंडळ, सेक्टर ८ या मैदानावर दि. १९ मार्च रोजी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेचे थेट प्रक्षेपण युट्युब लाईव्ह व GTL च्या माध्यमातून करण्यात आले. सुमारे ३ हजार लोकांनी ही स्पर्धा पाहिली व स्पर्धेचा आनंद घेतला. बेलारी पंचक्रोशीतील ब-याच खेळाडूंचा खेळ हा उत्कृष्ट दर्जाचा आहे. चांगल्या तरबेज खेळाडूंना भविष्यात चांगले खेळण्याची संधी मिळावी यासाठी श्री .गांगोबा प्रतिष्ठान कडून नेहमीच प्रोत्साहन दिले जाते. असोसिएशनने या पंचक्रोशीतील ३०० खेळाडूंना व अनेक क्रिकेटप्रेमी गावकऱ्यांना मुंबई सारख्या ठिकाणी एकत्र आणण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. यामुळे पंचक्रोशीतील तरुणांमध्ये खेळासोबत मैत्रीचे ॠणानुबंध जुळले आहेत.

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री. गांगोबा प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष दत्ताराम माईन, व्यवस्थापक संजय माईन, सेक्रेटरी कृष्णा माईन, खजिनदार संजय माईन, सल्लागार राजू घाग, प्रकाश माईन, गावकर कृष्णा गंगाराम माईन, गावकर जीतुदादा माईन, प्रतापदादा ठोंबरे, पांडुदादा माईन, प्रदीप सापते, विशाल कृष्णा माईन, प्रकाश सो.माईन, विषेश ठोंबरे, नामदेव माईन यांनी मोलाचे सहकार्य केले.

कमिटीचे पदाधिकारी राजा शिंदे, दिनेश जाधव, दिनेश कांबळे, निकेश सावंत, हरेश सापते, राहुल मोहिते, महेश गिड्ये आणि सर्व पदाधिकारी यांनी स्पर्धेला व आयोजकांना शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे पुणे येथील प्रसिद्ध उद्योजक श्री किशोर धावडे, रतन सूर्यवंशी, मोहन सूर्यवंशी, विशाल भागवत, विनय डबीर यांचे मोलाचे आर्थिक सहकार्य लाभले. संगमेश्वर-चिपळुण विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम सर यांनीही संस्थेला मोलाचे सहकार्य केले. संतोष गुरव प्रगती ट्रँव्हलचे मालक आणि संगमेश्वर टेनिस क्रिकेट समिती अध्यक्ष तसेच मंगेश गुरव व्यवसायीक (दिल्ली ) व जनक जागुष्टे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले