शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना पोलिस संरक्षण द्यावे; भीम युवा पँथर संघटनेची मागणी

Google search engine
Google search engine

रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले निवेदन

रत्नागिरी | प्रतिनिधी : चार दिवसांपूर्वी रत्नागिरी येथील भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत मद्यधुंद अवस्थेत असलेली व्यक्ती चढुन अवमान करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकारानंतर आंबेडकरी समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. या घटनेचे पोलिसांनी गांभीर्य ओळखून तातडीने संबधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करून व्यक्तीला ताब्यात घेतले. या प्रकारावरून आता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासह शहरातील इतर पुतळ्यांना पोलीस बंदोबस्त मिळावा अशी मागणी रत्नागिरी येथील भिम युवा पँथर संघटनेने जिल्हा अधिक्षकांकडे केली आहे.

निवेदनात असे म्हटले आहे की, दिनांक 19/03/2023 रोजी रत्नागिरी येथील एका व्यक्तीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केला. सदरची घटना ही निषेधार्ह आहे. त्यामुळे इतर जिल्हयाप्रमाणे आपल्या जिल्ह्यात व रत्नागिरी शहरात देखील महापुरुषाची विटंबना करणे हे लोन पसरताना दिसून येत आहे. त्यामुळे याबाबतीत सदर व्यक्तीवर योग्य ती कार्यवाही होणे गरजेचे आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारी जिल्हा शासकीय रुग्णालय असून या ठिकाणी लोकांची प्रचंड वर्दळ असते. त्यामुळे सिव्हील हॉस्पिटल येथे असणारी पोलिस चौकीची व्यवस्था ही प्रवेशव्दाराजवळच केली. तर पुतळ्याला देखील संरक्षण मिळेल. याबाबत आपण गांभिर्याने विचार करावा. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याबरोबर शहरातील इतर महापुरुषांच्या पुतळ्यांना देखील पोलिस संरक्षण मिळावे, अशी मागणी भीम युवा पँथर संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना दिले आहे. यावेळी भीम युवा पँथर संघटनेने अध्यक्ष प्रितम आयरे, कार्याध्यक्ष अमोल जाधव, उमेश कदम, रवींद्र पवार, ॲड प्रविण कांबळे आदी उपस्थित होते.

कोट
जिल्हा अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या बरोबर घडलेल्या प्रकरणावरून चर्चा झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासह शहरातील इतर महापुरुषांच्या पुतळ्यांना देखील पोलिस संरक्षण मिळावे अशी मागणी भीम युवा पँथर संघटनेच्या वतीने केली आहे. या मागणीसंदर्भात पोलीस अधीक्षकांनी सकारात्मकता दाखवून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.
– अमोल जाधव, (कार्याध्यक्ष भीम युवा पँथर संघटना)