रेडी येथील प्रसिद्ध श्री द्विभुज गणपती मंदिरात २६ मार्च पासून ‘श्री गजानन संप्रोक्षण कलशारोहण सोहळा’

Sri Gajanan Samprokshan Kalasharohan Sohla’ from March 26 at the famous Sri Dbhuj Ganapati Temple in Redi.

ढोल ताशांच्या गजरात कलशाचे मंदिरात झाले आगमन

वेंगुर्ला | प्रतिनिधी : रेडी येथील प्रसिद्ध श्री द्विभुज गणपती मंदिरात श्री गजानन संप्रोक्षण कलशारोहण सोहळा २६ ते २८ मार्च या कालावधीत साजरा होणार आहे. काल रात्री ढोल ताशांच्या गजरात कलशाचे रेडी येथे गणपती मंदिरात आगमन झाले.रेडी येथे हा भव्य दिव्य सोहळा होत आहे. दि. २६ रोजी शांतीपाठ, यजमान शरिरशुद्धी, गणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध, गणेशयाग, संप्रोक्षण विधी, नैवेद्य, आरती, सायं.५ वा. स्थानिकांचे भजन, रात्रौ ७ वा. आजगांवकर द.ना.मंडळाचा ‘देव झाला गुराखी‘ हा नाट्यप्रयोग, दि. २७ रोजी शांतीपाठ, प्राकारशुद्धी, संप्रोक्षण विधी, कलश संप्रोक्षण, वास्तुयजन, ग्रहयजन, मुख्य होम, नैवेद्य, आरती, सायं. स्थानिकांचे भजन व रात्रौ ८ वा. नृत्य व नाटक यांचा मेळ असलेला ‘दगडू सावधान‘ हा कार्यक्रम होणार आहे.
तर दि.२८ रोजी शांतीपाठ, कलशारोहण, बलिदान, पूर्णाहूती, सामुदायिक गा-हाणे, आरती, सायं.५ वा. स्थानिकांचे भजन, रात्रौ ९ वा. पार्सेकर द.ना.मंडळाचे ‘स्पर्शमणी‘ हे नाटक होणार आहे. भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीदेव गजानन देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.