World Water Day and two days training for officials at Gram Panchayat level
रत्नागिरी | प्रतिनिधी : जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष,जिल्हा परिषद रत्नागिरी व जे.पी.एस.फाउडेशन यांच्या सयुंक्त विद्यामाने दिनांक 23 व 24 मार्च 2023 रोजी ग्रामपंचायत स्तरावरील पदाधिकारी यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न्न झाले असून, यावेळी जागतिक जल दिन साजरा करण्यात आला.
सदर प्रशिक्षणाचे उदघाटन श्रीम.नंदिनी घाणेकर, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा याच्या हस्ते जलकुभांचे पूजन करून करण्यात आले.जल जीवन मिशन कार्यक्रम जिल्हामध्ये राबविण्यात येत असून, सन 2024 पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबांला वैयक्तीक नळ जोडणीव्दारे 55 लिटर प्रति मानसी गुणवत्तापुर्वक पाणी पुरवठा करणे हे उदिष्ट आहे. तसेच सदरच्या कार्यक्रमातंर्गत ग्रामस्तरावरील भागधारकांची जबाबदाऱ्या व भूमिका स्पष्ट होण्याच्या अुनुषंगाने सदर प्रशिक्षणाला सरपंच, उपसरपंच, ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समिती चे प्रतिनिधी,ग्रामसेवक, एम.एस.आर.एल.एम.च्या प्रभागनिहाय अध्यक्षा व जलसुक्षक हे उपिस्थत होते.यावेळी मा.श्रीम.नदिनी घाणेकर यांनी नळ पाणी पुरवठा योजना कार्यन्वयन, संचालन, देखभाल व दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतीची महत्वाची भूमिका असून, यामध्ये सर्वांनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच मा.श्री.राहुल देसाई यांनी गावस्तरावरील विविध घटकांची भूमिका वृंदीगत होणेच्या दृष्टीने सदरचे प्रशिक्षण महत्वाचे असून,लोकवर्गणीबाबत सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद देणेबाबत आवाहन केले. यावेळी लोकवर्गणीबाबत माहिती दर्शविणारे फलकाचे अनावर मान्यवराच्या हस्ते करण्यात आले.
सदरच्या प्रशिक्षणाला मंदार साठे युनिसेफ मुबंई, संदीप अध्यापक, पाडुरंग मिसाळ, संदीप शिंदे यानी मार्गदर्शन केले.
सदरच्या कार्यक्रमाला श्रीम.मयुरी पाटील, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, परिविक्षाणाधीन अधिकारी श्री.विवेक गुंड, श्री. योगेश कदम, श्री.अभिजीत कांबळे, उप अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग व सल्लागार हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्र संचाल आभार प्रदर्शन श्री.कुमार शिंदे यांनी केले.